वर्गात मस्ती करीत असताना एका पाच वर्षीय मुलाचा शिक्षकाला राग आला. शिक्षकाने या पाच वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. निरंजन थापा या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वासनांध शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेनंतर पालक संताप व्यक्त केला आहे आणि शिक्षकास तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात राहणारा रमेश थापा यांचा पाच वर्षीय मुलगा निरंजन हा कल्याण पश्चिमेतील रामबागेतील आदर्श हिंदी शाळेत शिकत आहे. सोमवारी संध्याकाळी निरंजन हा एका मुलासोबत मस्ती करीत होता. निरंजनचे हे वर्तन शिक्षकाला आवडले नाही. शिक्षक अशोक तिवारी यांनी लाकडी दांडका आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
निरंजनच्या तोंडावर, हातावर, पायावर मारहाणीचे व्रण आहेत. वडील रमेश थापा यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी विनोद पाटील करीत आहेत.
निरंजनला उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षकांनी मुलांना शिस्त लावणो हे त्यांचे काम असले तरी त्याला इतकी मारहाण करणो योग्य नाही. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.