पती-पत्नीतील वाद विकापाला गेले की नको त्या घटना घडतात. जळगावमध्ये देखील पती-पत्नी वाद झाले आणि या वादात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिचा पती सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव) याने चाकूने सपासप वार करत खून केला.या घटनेत पूजाचा भाऊ शंकर भिका चव्हाण (वय […]
ताज्याघडामोडी
आशा स्वयंसेविकांचा संप मागे; १ जुलैपासून पगारात वाढ
राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप […]
पोटनिवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून भाजप तसेच ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तर भाजपने आंदोलनही करण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही परीस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा व त्यानंतर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणूक घ्याव्यात, अशी मागणीही केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदनही दिले. त्यानंतर राज्य सरकारची राज्यमंत्री मंडळाची […]
चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीच्यावतीने मिशन ऑक्सिजन मोहिमेचा शुभारंभ
चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीच्यावतीने मिशन ऑक्सिजन मोहिमेचा शुभारंभ पुणे – सध्या जगात आणि भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. मागील वर्षी या महामारीच जे रूप होत ते यावर्षी बदललेलंही आपण पाहिलं. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या पुढे मागल्या वर्षी वेगळे प्रश्न होते आणि आज वेगळे प्रश्न आहेत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेचा. […]
पाच हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
औरंगाबाद : तक्रारदाराची त्याच्या सोसायटीतील रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला ताब्यात घेतले आहे. पूनमसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (५७, रा. बेदवाडी, परसोडा, ता.वैजापूर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो पंढरपूर सज्जा येथे कार्यरत आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी वळदगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. तक्रारदाराने सातारा परिसरात रो-हाऊस खरेदी […]
रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिसाची आत्महत्या; पोलिसदलात खळबळ
पुणे – घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रज्जाक महंमद मणेरी, वय २४ मूळगाव बावडा, ता. इंदापूर असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव असून ते राजगड पोलिस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. याबाबत रज्जाक यांचे वडील […]
दिलासादायक : करोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा करोनाचा विळाखा घट्ट बसलेला बघायला मिळाला आहे. करोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. या जिवघेणा विषाणूवर एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना लसीचा एक डोस कोरोना विषाणूपासून होणारे मृत्यू […]
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी
नवी दिल्ली – कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारत बायोटेकने भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर केली आहे. २२ जून रोजी निकालासंदर्भात औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीशी बैठक होण्याची शक्यता आहे. तर, बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर हैदराबादस्थित भारत बायोटेक त्याच्या लसीसंदर्भात ‘प्री-सबमिशन’ बैठक देखील होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या […]
पैज लावून सांगतो, करोनाची तिसरी लाट येणारच नाही; भारताच्या ‘वॉरेन बफेट’चा दावा
नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. त्यातच करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाजही वर्तविला आहे. सरकारी यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाली आहेत. मात्र भारतातील वॉरेन बफेट म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांनी […]
राज्यात ५ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका जाहीर, या दिवशी मतमोजणी
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे आता राज्यात 19 जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका घेण्यात येणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या […]











