गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाच हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : तक्रारदाराची त्याच्या सोसायटीतील रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला ताब्यात घेतले आहे. पूनमसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (५७, रा. बेदवाडी, परसोडा, ता.वैजापूर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो पंढरपूर सज्जा येथे कार्यरत आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी वळदगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदाराने सातारा परिसरात रो-हाऊस खरेदी केल्यानंतर त्यांची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी वळदगांव येथील तलाठी पुनमसिंग डोंगरजाळे याच्याशी संपर्क साधला होता.दरम्यान, तलाठ्याने डोंगरजाळ यांनी तक्रारदाराला तुम्ही आणि तुमच्या सोसायटीत राहणाऱ्याचे असे प्रत्येकी ३ हजार रूपये प्रमाणे दोघांचे ६ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती दोघांत ५ हजार रूपये देण्याचे ठरले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दिली होती.

एसीबीचे निरीक्षक गणेश घोट यांनी शहानिशा करुन सापळा लावला असता तलाठी डोंगरजाळ याने लाच घेतल्याचे स्पष्ट होताच ताब्यात घेण्यात आले. तलाठ्याविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई ढोकरट यांच्यासह पथकातील हनुमंत वारे, सुनील पाटील, बाळासाहेब राठोड, रविंद्र काळे, केवलसिंग घुसिंगे चांगदेव बागूल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *