ताज्याघडामोडी

चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीच्यावतीने मिशन ऑक्सिजन मोहिमेचा शुभारंभ

चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीच्यावतीने मिशन ऑक्सिजन मोहिमेचा शुभारंभ

पुणे – सध्या जगात आणि भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. मागील वर्षी या महामारीच जे रूप होत ते यावर्षी बदललेलंही आपण पाहिलं. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या पुढे मागल्या वर्षी वेगळे प्रश्न होते आणि आज वेगळे प्रश्न आहेत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेचा.

वेळेसह आधुनिक होणाऱ्या जगात झाडांची मोठी कत्तल होत गेली,त्याचा परिणाम असा झाला की पर्यावरणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. जर जगात झाडचं नसतील, तर कितीही फॅक्टरी लावल्या, तरी ऑक्सिजन कमीच पडणार असल्याचं त्रिकालबाधित सत्य आपल्या समोर आलं.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार,भारतात जर जांभूळ, कडुलिंब,पिंपळ,वड,अशोक ही 5 झाडं अधिकाधिक लावली गेली असती, तर देशात ऑक्सिजनची कमतरता भासलीच नसती.

झाड लावणं आणि त्याच जतन करणं हा एक संस्कार आहे.हा संस्कार रुजविण्याच काम आज मंगळवार दि. २२ जून २०२१ रोजी मिशन ऑक्सिजन च्या माध्यमातून चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा.लि.सुवर्णपेढीने चालू केलेलं आहे.

या मोहिमेचा शुभारंभ डॉ.अविनाश भोंडवे
(अध्यक्ष, इंडियन मेडिकल अससोसिएशन, महाराष्ट्र राज्य) आणि डॉ.तुकाराम रोंगटे (लेखक आणि प्राध्यापक, मराठी विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते करण्यात आला.

येत्या दहा दिवसांमध्ये चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा.लि.सुवर्णपेढीच्या पुणे आणि चिंचवड क्लस्टर मधील एकूण सात शोरूम्समध्ये मिशनऑक्सिजन हि वृक्ष रोपणाची मोहीम चालू असणार आहे.

या मोहिमेअंतर्गत खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक सीड बॉल दिलं जाणार आहे.त्याची लागण आणि संगोपनाच्या सविस्तर माहितीसह एकूण ७००० हजार सीड बॉल मिशनऑक्सिजन मोहिमे अंतर्गत ग्राहकांना दिली जाणार आहेत.

उत्तरोत्तर ग्राहकांच्या प्रतिसादाच्या जोरावर आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करीत असलेला प्रत्येक घटक तसेच प्रत्येक संस्थेला या मिशनऑक्सिजन मोहिमेत सामील करून घेतलं जाणार आहे. येत्या काळात मिशनऑक्सिजन मोहिमेला मोठं स्वरूप देण्याचा मानस चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. सुवर्णपेढीच्या व्यवस्थापनाने उद्घाटन प्रसंगी बोलून दाखविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *