ताज्याघडामोडी

राज्यमंत्रिमंडळात मोठा बदल होणार?

राज्यमंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एका राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळण्याची शक्यता असून यातील एक मंत्री आदिवासी भागातील असून दुसरा मुंबईतील असल्याचं सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसपूस […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज मध्ये 25 जुलै रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे रविवार दिनांक 25 जुलै 2021 रोजी “रीलीव्हंस ऑफ इंजीनीरिंग अँन्ड सायन्स फॉर एनव्हायरमेंट अँन्ड सोसायटी 2021” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री.पांडुरंग प्रतिष्ठान चे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक व प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली. कोरोंना च्या महामारीमुळे सदर ची परिषद […]

ताज्याघडामोडी

शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात.

शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात.        शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक पंढरपूर शहरातील प्रत्येक भागात, प्रभागात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. परंतु ही वेबसाईट हँग झाल्याने विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कुर्‍हाडीने वार करुन तरुणाची‌ हत्या, संशयित मेहुणा पसार

मेहुण्यानेच तरुणाची‌ कुर्‍हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री तरुणाची हत्या झाली. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. विशाल‌ वामन ठोसरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुर्‍हाडीने […]

ताज्याघडामोडी

न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

 दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या  प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा  होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.  शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के […]

ताज्याघडामोडी

आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु, ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध

वेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार तर खाजगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकुण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. व्यवसाय […]

ताज्याघडामोडी

राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक,आर्थिक सर्वेक्षण होणार

राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण लवकरच करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यातील सदस्यांची बैठक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार […]

ताज्याघडामोडी

अतुल खुपसे पाटिल यांच्यामुळे मिळाला एका विधवा शिक्षक पत्नीला ८ वर्षाने न्याय

माढा तालुक्यातील रोपळे गावचे असणारे व सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारे पांडुरंग तात्यासो आवताडे यांना २००३ मध्ये अर्धांगवायुचा झटका आला आणि तेव्हापासून ते २०१८ पर्यंत ते अंथरुणाला खिळुन होते शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कुटुंब उघड्यावर पडले. मोलमजुरी करुन आपल्या एकुलत्या एक मुलीचा सांभाळ करणाऱ्या त्यांच्या पत्नी पौर्णिमा ह्या २०१४ पासुन […]

ताज्याघडामोडी

इतिहासाच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातून मुघलांना वगळले; आता ‘यांची’ थोरवी शिकवणार

 विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने इतिहासाच्या नव्या अभ्यासक्रमाची जुळणी केली आहे. युजीसीच्या या प्रस्तावित अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवण्यात आले असून त्यानुसार देशावरील मुस्लीम आक्रमकांचा इतिहास अभ्यासातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सम्राट अकबर आणि मुघलांपेक्षा महाराणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा यूजीसीने तयार केला असून त्यावर […]