ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज मध्ये 25 जुलै रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कर्मयोगी इंजीनीरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे रविवार दिनांक 25 जुलै 2021 रोजी “रीलीव्हंस ऑफ इंजीनीरिंग अँन्ड सायन्स फॉर एनव्हायरमेंट अँन्ड सोसायटी 2021” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री.पांडुरंग प्रतिष्ठान चे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक व प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली. कोरोंना च्या महामारीमुळे सदर ची परिषद ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
सदर च्या राष्ट्रीय परिषदेला आय. आय. टी. गुवाहाटी येथील डॉ. एस एन जोशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉंजीकल यूनीवर्सिटी, लोनेरे येथील डॉ. एस बी देवोसरकर प्रमुख वक्ते म्हणून लाभणार आहेत. या राष्ट्रीय परिषदेला विविध राज्यातून नामांकित कॉलेज मधून शंभर हून अधिक शोधनिबंध सादर होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक व संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी दिली.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध राज्यातून नामांकित कॉलेज चे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी, विज्ञान शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी शोधनिबंध सादर करणार आहेत. सदरच्या परिषदे मध्ये इच्छुक अभियांत्रिकी व सायन्स विषयातील संशोधक, पी.एच.डी. व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यानी दि. 17 जुलै पर्यंत शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन डॉ. अभय उत्पात यांनी केले आहे. अधिक माहिती साठी 7719045745 / 9158325055 या क्रमांकावर संपर्क करावा.
सदर च्या परिषदेसाठी कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ. अजित कणसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. सारंग कुलकर्णी, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ आणी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. या राष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. प्राजक्ता जाधव व प्रा.जयमाला हिप्परकर सह-समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *