ताज्याघडामोडी

अतुल खुपसे पाटिल यांच्यामुळे मिळाला एका विधवा शिक्षक पत्नीला ८ वर्षाने न्याय

माढा तालुक्यातील रोपळे गावचे असणारे व सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारे पांडुरंग तात्यासो आवताडे यांना २००३ मध्ये अर्धांगवायुचा झटका आला आणि तेव्हापासून ते २०१८ पर्यंत ते अंथरुणाला खिळुन होते शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कुटुंब उघड्यावर पडले. मोलमजुरी करुन आपल्या एकुलत्या एक मुलीचा सांभाळ करणाऱ्या त्यांच्या पत्नी पौर्णिमा ह्या २०१४ पासुन पतीच्या पगार व पेंशन संदर्भात जत पंचायत समिती व सांगली जिल्हा परिषद मध्ये हेलपाटे मारुन उंबरठे झिजवत होत्या मात्र न्याय मिळत नव्हता. मात्र जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांना हि बाब समजताच त्यांनी जिल्हा परिषद गाठुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले अन् त्या विधवा शिक्षक पत्नीला न्याय मिळाला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रोपळे येथील पांडुरंग आवताडे हे १९९० साली शिक्षक म्हणून  कामाला परिषदच्या शाळेत कामाला लागले. पत्नी व एक मुलगी

असा सोन्याचा संसार सुरु होता. मात्र दुर्दैवाने त्यांना २००३ मध्ये आर्धागवायूचा झटका आला. आणि ते सलग १५ वर्षे ते अंथरुणात पडून होते. यावेळी त्याच्या पत्नीने शेतात मजुरीवर जाऊन आपली एकुलती एक लहान मुलगी घेऊन पतीचा संभाळ केला. शेवटी पंधरा वर्षांपासून अंथरुणाला खिळून असणाऱ्या गुरुजींनी २०१८ ला जगाचा निरोप घेतला आणि कुटुंब उघड्यावर पडले. आवताडे यांच्या पत्नी पौर्णिमा ह्या २०१४ पासून जिल्हा परिषद सांगली आणि पंचायत समिती जत येथे आपल्या पतीची पगार पेंशन संदर्भात चकरा मारत होत्या. २०१४ ते २०१९ पंचायत समीती आणि नंतर फाईल २०१९ ला जिल्हा परिषद ला गेलेली फाईल २०१९ पासून २०२१ पर्यंत चकरा चालू होत्या. या कामासाठी गुरुजीची मुलगी आणि विधवा पत्नी यांनी अनेकवेळा उंबरठे झिजवले. दोनशे रूपये मजूरी करून या पत्नीचा संसाराचा गाडा चालत होता. परंतु भारत पवार नावाचा जि. प. मधील क्लार्क याने वेळोवेळी त्यांना पैश्याची मागणी करू लागला. पौर्णिमा यांनी एका शेतकऱ्याकडून पैसे मजुरी उच्चल म्हणून चौदा हजार घेऊन त्या पवार नामक क्लार्कला दिले. २०० रुपयाने मजुरी करणाऱ्या पौर्णिमा यांची पगार उच्चल घेतल्याने १२५ रुपयांवर आली. अशातच कागदपत्रे व फाईलसाठी सांगली – सोलापुर असे हेलपाटे होवु लागले. दरम्यान क्लार्क पुन्हा १० हजारांची मागणी करु लागला, त्यासाठी त्यांना फोन करु लागला. कंटाळलेल्या मायलेकिंनी फोन उचलणे व पेंशन कामासाठी जिल्हा परिषदेमध्ये जाणे बंद केले. 

दरम्यान जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे पाटील हे कार्यकर्त्याची मिटींग घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आले होते. काही कार्यकर्त्यांनी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. यावेळी खुपसे पाटील मिटींग संपवून सरळ जि.प .सांगली येथे कार्यकर्त्यासह गेले आणि त्या शिक्षकाची मुलगी प्रेरणा आवताडे सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी च्या केबीन गाठली आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी ‌राहुल गावडे यांना बोलावून घेत तातडीची बैठक लावून प्रश्न सोडवायला लावले.

 यावेळी खुपसे पाटील  पवार क्लार्क यावर आक्रमक होत पैस्याबददल जाब विचारताच गावडे यांनी मध्यस्थी केली खुपसे पाटील यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी गावडे सर्व क्लार्क ला बोलवून धारेवर धरत व्यवस्थीत काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपकार्यकारी अधिकारी राहुल गावडे आणि खुपसे पाटील यांच्या त झालेल्या चर्चेत ऐक शेतमजुरी करणार्या महीलेचे पैसे खायला लाज वाटत नाही का म्हणत खुपसे पाटील आणि राहुल गावडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पवार क्लार्क याला बोलवून गावडे यांनी झापले आणि खुपसे पाटील यांना लेखी अर्ज देण्यास सांगितले व त्याच्यावर कारवाई करतोच असे आश्वासन दिले. तर आवताडे गुरुजींची पेंशन फाईल लवकर मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले आणि विधवा शिक्षक पत्नी पौर्णिमा यांना न्याय मिळालाच शिवाय सांगली जिल्हा परिषदेमधील भ्रष्टाचार उघड झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *