ताज्याघडामोडी

न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

 दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या  प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा  होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.  शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे.

यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्हाचा लागला आहे.

असा तपासा 10 वीचा निकाल

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा

SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.

आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.

लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *