ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी यासाठी आज राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ओबीसींचा इंपिरिकल डेटा उपलब्ध नसल्याने […]
ताज्याघडामोडी
महाराष्ट्रात आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण
महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरात पसरत असलेला कोरोना आणि इतर सापडलेले नवीन व्हायरस यांचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्यव्यवस्था काम करीत आहे.कोरोना रोगाची दुसरी फेज संपली असताना तिसऱ्या फेजचे संकेत सध्या मिळत आहेत. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्य विभाग काम करीत आहे. नुकताच कोरोना पाठोपाठ […]
तक्रार आल्यानंतर आता दहा मिनिटात पोचणार पोलीस
राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर आता डायल 112 हा तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे. त्यानुसार एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यास शहरी भागात केवळ दहा मिनिटांत पोलीस तेथे पाहोचतील आणि ग्रामीण भागात पंधरा मिनिटांमध्ये पोलीस तेथे पोहचतील अशी व्यवस्था केली जात आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. या प्रकल्पानुसार राज्यातील […]
पंढरपूर बार असोसिएशन्स यांचे वतीने पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व वैदकीय अधिकारी यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणारी व सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर अर्बन बँक हि नेहमीच समजाचे हित जोपासत कार्य करीत असते याच प्रकारे बँकेने वैश्विक कोरोना महामारीमुळे झालेल्या टाळेबंदीच्या काळात गरज असेल त्याला कर्ज रूपाने अर्थपुरवठा करण्याचे काम केले यापैकीच एक म्हणजे कायदेशीर मित्र असणारे वकील बांधवाना देखील बँकेने कोणत्याही प्रकारचे तारण न […]
महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, असा तपासा तुमचा रोल नंबर
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार आहे. बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. कसा चेक […]
महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला, गणपतराव देशमुखांना नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते आणि राजकारणी गणपतराव देशमुख यांचा काल(३० जुलै) निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने अनेक राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गणपतराव आबांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली महाराष्ट्राचे उपमुख्यमनातरी अजित पवार यांनी ट्विट करून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली वाहिली […]
वेळीच सावरा अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाणार
जगाला धडकी भरवणाऱ्या करोनाचा अजूनही नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आले नाही. त्यातच हा विषाणू रोज नवीन रूप धारण करत आणखी तीव्र होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, याच करोनाच्या डेल्टा व्हेरियंटविषयी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत […]
ओबीसी युवा आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी नेते संजय धाकु कोकरे यांच्या आदेशाने व ओबीसी युवा आघाडीचे मार्गदर्शक ऍड.उमेश टुमणे व ओबीसी महीला प्रदेशाध्यक्ष डाॅ.माधुरीताई पारपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी युवा आघाडी सोलापूर जिल्हा व ओबीसी युवा आघाडी पंढरपूर तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष सलमान आतार यांनी जाहीर केल्या आहेत. ओबीसी […]
पंढरपुरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास
पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीचे प्रकार उघडकीस येत असून दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.दुचाकी चोरट्याबरोबरच आता पंढरपुरात चेन स्न्याचर देखील वावरू लागले असावेत अशी शंका काल शनिवारी घडलेल्या घटनेवरून व्यक्त होत असून शुक्रवार दिनांक ३० जुलै रोजी भर दुपारी शहरातील भर ठिकाण असलेल्या घोंगडे गल्ली परिसरात महिलेच्या गळ्यातील दीड तोळा […]
पोलीस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीच्या मागणीचा ऑडिओ व्हायरल, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील एका उपाहारगृहातून कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी आणण्यास सांगितल्याची पोलीस उपायुक्तांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. हद्दीतील उपाहार गृहचालकाला पैसे कशाला द्याायचे, असे उपायुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्याचे ध्वनीफितीतून उघड झाले आहे. या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, संबंधित […]











