ताज्याघडामोडी

पंढरपूर बार असोसिएशन्स यांचे वतीने पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व वैदकीय अधिकारी यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न

 

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणारी व सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर अर्बन बँक हि नेहमीच समजाचे हित जोपासत कार्य करीत असते याच प्रकारे बँकेने वैश्विक कोरोना महामारीमुळे झालेल्या टाळेबंदीच्या काळात गरज असेल त्याला कर्ज रूपाने अर्थपुरवठा करण्याचे काम केले यापैकीच एक म्हणजे कायदेशीर मित्र असणारे वकील बांधवाना देखील बँकेने कोणत्याही प्रकारचे तारण न घेता व अत्यल्प कमी कालावधी मध्ये कमीत कमी कागदपत्रात कर्ज पुरवठा केला. या मुळे कोरोना काळातील आर्थिक  मदत झाल्याचे वकील बांधवानी सांगितले या निमित्ताने वकिलांना सहज कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल बार असोसिएशन्स चे वतीने पंढरपूर बार असोसिएशन्स चे अध्यक्ष भगवानराव मुळे यांनी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार केला. सांगोला, मंगळवेढा व माळशिरस बार असोसिएशन्स यांचे वतीने आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार करण्यात आला. संचालक मुन्नागीर गोसावी, हरीश ताठे , मनोज सुरवसे, पांडुरंग घंटी, प्रकाश कुलकर्णी मुख्यकार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांचा सत्कार करण्यात आला.

 

पंढरपूर तालुक्यातील वकील बांधवांचे front line workar म्हणून लवकर व सहज पद्धतीने लसीकरण करून दिल्याबद्दल पंढरपूर तालुक्याचे  वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांचा सन्मान सदस्य डी डी पवार व डॉ बजरंग धोत्रे  यांचा सन्मान उपाध्यक्ष विकास भोसले यांचे हस्ते करण्यात आला.

 

पंढरपूर बार असोसिएशन्स चे सदस्य वकील श्री नामदेव तरळगट्टी यांची जिल्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याच्या आनंद व्यक्त करताना वकील बांधव यांचे वतीने सदस्य इंद्रजीत परिचारक यांचे हस्ते  गौरविण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी बँकेने कोरोना काळातील विविध घटकातील लोकांना सहकार्य केले आहे ज्या ज्या घटकांना या कोरोन टाळेबंदीचा त्रास सहन करावा लागला त्या प्रत्येक घटकाला विनातारणी कर्ज आपल्या बँकेच्या माध्यमातून आपण गेली एक दीड वर्षापासून करीत आहोत.  समाजातील प्रत्येक घटकाल सोबत घेऊन त्यांना सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली. या प्रकारची योजना राबविताना मुख्यकार्यकारी अधिकारी व सर्व संचालक मंडळ यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही आणि सर्वानुमते योजना मंजूर करून त्याची अंमलबजावणी करून ती प्रत्यक्षात आणली त्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त करणे आवश्यक आहे असे म्हणाले व सर्व वकील बांधवांचे सेवेची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर मधील जेष्ठ विधीज्ञ श्री एस आर जोशी सर हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोसिएशन्स चे सचिव सोमेश चांडोले यांनी केले सदस्य वकील राजेश भादुले सांगोला बार असोसिएशन्स चे अध्यक्ष गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल सर्व वकील बांधवांचे वतीने समाधान व्यक्त केले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार उपाध्यक्ष विकास भोसले यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *