ताज्याघडामोडी

महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, असा तपासा तुमचा रोल नंबर

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार आहे. बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

कसा चेक कराल रोल नंबर अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर जा. वेबसाइटवर गेल्यावर मुख्यपृष्ठावर, जिल्हा आणि तालुका निवडा आणि आपले नाव त्यात टाका.रोल नंबरच्या तपशीलांसह एक यादी स्क्रिनवर दिसेल. आपलं नाव आणि सीट नंबर तपासा आणि त्यानंतर तो नोट करुन ठेवा. 

निकालास विलंब बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. मात्र इयत्ता 12 वी राज्य बोर्ड निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्यानं निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जुलै अखेरीस 12 वीचा निकाल लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार असला तरी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

परीक्षा रद्द यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

12 वीच्या निकालाचं विशेष मूल्यांकन दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *