महाराष्ट्रात आज ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४,५०५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या […]
ताज्याघडामोडी
गृहमंत्र्यांनी दिले मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेचे आदेश
नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नी संजीवनी काळे यांनी शारिरीक, मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटून गेले तरी अद्याप काळे यांना अटक केली नसल्यामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. आज पोलीस […]
क्रूरतेचा कळस! मुलीनं Love Marriage केलं म्हणून जन्मदात्यानेच तिच्या मानेवर चालवला पेपर कटर
आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीची मान कापण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत मुलीच्या घरात घुसून पेपर कटरनं त्यांनी मुलीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली असून पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. मुलीने केला होता प्रेमविवाह ही घटना आहे तमिळनाडूच्या थिरुप्पूर गावातली. या गावात राहणारे पुराजा हे चित्रकार म्हणून काम करतात. त्यांची मुलगी […]
आता मनसे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये वादाची ठिणगी
राज ठाकरे याना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली होती. गायकवाड यांची ही टीका मनसेला चांगली झोंबली आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे. वसंत मोरे […]
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.राज्य शासनाच्या वतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे […]
मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा
धाकट्या मुलाच्या मदतीने सख्ख्या आईनेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा मृतदेह आरोपी मायलेकांनी घरातच पुरला होता. मात्र घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हरियाणातील रोहतकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला. […]
चिंताजनक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी तीन प्रकार आले समोर
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतानाच डेल्टाच्या व्हेरिएंटन डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. डेल्टाच्या वाढत्या संसर्गानं राज्यात हाहाकार माजवला आहे. डेल्टा व्हेरिएंटची रुग्णसंख्याही हळूहळू वाढत चालली आहे. अशातच आता या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी तीन विषाणू आढळले आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असून रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या चिंतेच्या […]
स्वातंत्र्यदिनी दोन हजारांची लाच स्वीकारणारी ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात
गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील ग्रामसेविका प्रीती लक्ष्मीकांत त्रिशुलवार यांना 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज स्वातंत्र्यदिनी रंगेहाथ पकडले. अंगणवाडीत स्वयंपाक करणाऱ्या महिलेचे मानधन अदा करण्यासाठी तिच्याकडून त्यांनी लाच मागितली होती. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या महिलेला ग्रामपंचायत कार्यालयाकडून तिच्या मानधनाचा धनादेश घ्यावयाचा होता. परंतु धनादेश देण्याचा मोबदला म्हणून ग्रामसेविका प्रीती त्रिशुलवार हिने […]
शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगावच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात शेतकऱ्याने प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.दरम्यान, पोलिसांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीत झालेले मोठे […]
पालकमंत्री भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत,त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे […]











