पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.राज्य शासनाच्या वतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
