ताज्याघडामोडी

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले.

कोरोनामुळे सगळ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता राज्यातील शाळा उघडण्याबाबत राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश […]

ताज्याघडामोडी

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी

देशातून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस द्यावा का हा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय. WHOने बुधवारी म्हटलं की, सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तलवारीने केक कापणे भोवले; कथित ‘भाई’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कथित ‘भाई’ने मध्यरात्रीच्या सुमारास चौकात युवकांची गर्दी जमवून चक्क तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाला होता.त्यानुसार पोलिसांनी कथित ‘भाई’चा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना हिंगणघाट येथील संत गोमाजी वॉर्ड परिसरात मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घडली. प्रतिक हनुमान ठाकरे (१९) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने चौघांची पंप कर्मचाऱ्याला मारहाण

नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आव्हान देणारी घटना पंचवटीत घडली.पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याला हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर या टोळक्‍यांनी पंप कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केले. पंप कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या […]

ताज्याघडामोडी

आईने गरिबीत पाहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण

ठाण्यातील उल्हासनगरमध्ये एका तरुणाने आपल्या आईची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करत तिला हेलिकॉप्टरमध्ये बसून शहरभर फिरवले. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाचा हा प्रयत्न लोकांना खूप आवडला आहे. त्याला कलियुगाचा श्रावणकुमार म्हटले जात आहे. उल्हासनगर येथील रहिवासी प्रदीप गरड यांच्या आई रेखा दिलीप गरड यांचा मंगळवारी 50 वा वाढदिवस होता. प्रदीपने त्याच्या आईला भेट देण्यासाठी सरप्राईज […]

ताज्याघडामोडी

ग्रामीण भागांमध्ये करोनाच्या चाचण्यांचा वेग कमी

करोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरीही तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या नियमित स्वरूपामध्ये करणे गरजेचे आहे. मात्र आरोग्यव्यवस्था सक्षम नसलेल्या ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी या चाचण्यांचा वेग कमी झाला आहे.मागील दीड वर्षांपासून सातत्याने जनजागृती करूनही सर्वसामान्यांमध्ये अपेक्षित जनजागृती झाली नसल्याची खंत राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये कार्यरत असलेले आरोग्य कार्यकर्ते सुधीर मोहिते यांनी व्यक्त केली. करोना […]

ताज्याघडामोडी

भयंकर! 2 लाखांच्या कर्जाचं ओझं; 4 चिमुकल्यांसह हतबल पित्याने घेतलं विष; मन सुन्न करणारी घटना

उत्तर प्रदेशमध्ये एक मन सुन्न करणारी घटना करणार घटना घडली आहे. 2 लाखांच्या कर्जाचं ओझं झाल्याने 4 चिमुकल्यांसह एका हतबल पित्याने विष घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूरमध्ये एका वडिलांनी आपल्या चारही लहान मुलांना विष खायला दिलं. त्यानंतर स्वत: ही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाला […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकार बरखास्त होईल आणि पुन्हा रामराज्य येईल

राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून अनेकदा या सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असा दावाही अनेकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. अशातच आता जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनीही या सरकारवर भाष्य केलं आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात

9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कारवाईचं सत्र सुरू आहे. 9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात थेट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचं नाव आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय अरविंद […]