ताज्याघडामोडी

आईने गरिबीत पाहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण

ठाण्यातील उल्हासनगरमध्ये एका तरुणाने आपल्या आईची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करत तिला हेलिकॉप्टरमध्ये बसून शहरभर फिरवले. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाचा हा प्रयत्न लोकांना खूप आवडला आहे. त्याला कलियुगाचा श्रावणकुमार म्हटले जात आहे.

उल्हासनगर येथील रहिवासी प्रदीप गरड यांच्या आई रेखा दिलीप गरड यांचा मंगळवारी 50 वा वाढदिवस होता. प्रदीपने त्याच्या आईला भेट देण्यासाठी सरप्राईज हेलिकॉप्टर राइडची व्यवस्था केली होती. प्रदीपने सांगितले की, मंगळवारी आईला सिद्धिविनायकाकडे नेण्याच्या बहाण्याने तो थेट जुहू एअरबेसवर पोहोचला आणि हेलिकॉप्टर दाखवून तिला सरप्राइज दिले. आपल्या मुलाकडून मिळालेली ही अनोखी भेट पाहून रेखा आपले अश्रू आवरू शकल्या नाही आणि प्रवासादरम्यान अनेक वेळा रडल्या.

रेखा मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या आहेत. लग्नानंतर त्या पतीसह उल्हासनगरला शिफ्ट झाल्या. रेखा यांना 3 मुले आहेत आणि प्रदीप त्यापैकी सर्वात मोठा आहे. प्रदीप सातवीच्या वर्गात शिकत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईने मोठ्या कष्टाने तिन्ही मुलांना शिकवले. मुलांच्या पोटासाठी त्यांनी दुसऱ्यांच्या घरात कामे केली. रेखाचा मोठा मुलगा प्रदीप आज एका कंस्ट्रक्शन कंपनीत मोठ्या पदावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *