ताज्याघडामोडी

राज्य सरकार बरखास्त होईल आणि पुन्हा रामराज्य येईल

राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून अनेकदा या सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असा दावाही अनेकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. अशातच आता जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनीही या सरकारवर भाष्य केलं आहे.

शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या’तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत आहे,’ असं म्हणत शालिनीताई पाटील या वसंतरावदादा यांच्या आठवणींनी गहिवरल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून त्या म्हणाल्या, ‘शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *