ताज्याघडामोडी

कोरोना बाधितांना एक वर्षांनंतरही जाणवत आहेत साईड इफेक्ट

कोरोना झाल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम दीर्घकाळ राहत असून अनेकांना एका वर्षानंतरही ते जाणवत असल्याचं अभ्यासात म्हणण्यात आलं आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त सँपल साईज असणारा हा सर्व्हे असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकारचा ‘लॉँग कोव्हिड’ निम्म्या कोरोना रुग्णांना जाणवत असल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या […]

ताज्याघडामोडी

सोलापूर डीसीसी बँकेचा कारभार आणखी काही प्रशासकाच्या हाती ठेवणेच गरजचे

नेतेमंडळीच्या सहकारी संस्था संस्थांना भरमसाठ कर्जे देऊन अनेक नेत्यांशी संबंधित असलेल्या संस्थांकडून वसुलीच होत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेली होती.राजकारणात पुढारी म्हणून वावरणाऱ्या अनेकांनी हि बँक भाकड होई पर्यत पिळून खाण्याचा प्रकार केला आणि असुदे आपलाच आहे म्हणत जिल्ह्याचे,राज्याचे नेते म्हणून वावरणाऱ्या,विविध पक्षात वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळत […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक ! एसटी महामंडळाच्या महिला वाहकाच्या हातातच तिकीट मशीनचा स्फोट

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोट होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कानातच ब्लुटुथ हे़डफोनचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना आता एसटी महामंडळाच्या बसमध्ये वापरण्यात येणाऱ्या तिकीट व्हेंडींग मशीनचा स्फोट झाला. ही घटना गोंदियात घडली आहे. गोंदिया बसस्थानकात एका महिला वाहकाच्या हातात तिकीट व्हेंडींग मशीनचा स्फोट झाला. यामध्ये महिला वाहक गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे एकच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हे पावडर मिसळलेला ३६० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त

दिनांक २६/08/2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कोंडार पठार (नेवरे), ता. माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न)  प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत कुचेकर यांच्या समवेत  धनाजी रावसाहेब जाधव यांचे घर क्र. ७२, कोंडार पठार(नेवरे), ता. माळशिरस, जि. सोलापूर सदर ठिकाणी तपासणी […]

ताज्याघडामोडी

तिसऱ्या लाटेची चाहूल? कोरोनाचे सक्रिय रुग्ण वाढले; 24 तासात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

देशभरात कोरोना रुग्णांच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून सक्रिय रुग्णांची संख्या यामुळे वाढली आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात 44 हजार 658 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 32 हजार 988 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. […]

ताज्याघडामोडी

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने (ED) दणका दिला असून खडसेंची मातमत्ता ईडीने जप्त केली आहे. तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त करण्यात आहे आहे. एकनाथ खडसे यांच्यावर जो मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाची चौकशी ईडी गेले काही दिवस करत आहे. […]

ताज्याघडामोडी

खासदार संभाजीराजे 2 सप्टेंबरला घेणार राष्ट्रपतींची भेट

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रपती भवनकडे पत्रव्यवहार करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरूवार, दि. २ सप्टेंबर रोजी भेटीची वेळ दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून दिली. यावेळी, खासदार संभाजीराजे यांनी आपल्यासोबत राष्ट्रपतींच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील […]

ताज्याघडामोडी

SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ही सुविधा 30 सप्टेंबरला बंद होणार, पटकन तपासा

SBI, HDFC, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी देत ​​आहेत, जी 30 सप्टेंबर 2021 रोजी बंद होणार आहे. बँकांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष ऑफर आणली होती.या FD मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त व्याजदरासाठी ही ऑफर होती. म्हणजेच नियमित ग्राहकाला मिळालेल्या व्याजापेक्षा 1 टक्के […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज- राजेश टोपे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज (26 ऑगस्ट) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले होते. आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्यास उच्चांकी ३०५ दर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सौद्यामध्ये बेदाण्यास ३०५ रूपये किलो असा उच्चांकी दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी दिली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर मंगळवारी व शनिवारी बेदाणा सौदे होतात. मंगळवारी तुलसी ट्रेडिंग कंपनी प्रो.विनीत अशोक बाङ्गना यांचे आडत दुकानी तालुक्यातील करकंब येथील दिगंबर रामचंद्र घाटुळे यांच्या ५० बॉक्स […]