गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हे पावडर मिसळलेला ३६० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त

दिनांक २६/08/2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कोंडार पठार (नेवरे), ता. माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न)  प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत कुचेकर यांच्या समवेत  धनाजी रावसाहेब जाधव यांचे घर क्र. ७२, कोंडार पठार(नेवरे), ता. माळशिरस, जि. सोलापूर सदर ठिकाणी तपासणी केली असता तपासणीवेळी गोठ्यामध्ये १५ प्लॅस्टिक कॅन आढळून आले. त्यापैकी ९ कॅनमध्ये प्रत्येकी ४० लिटर प्रमाणे ३६० लिटर व्हे पावडर (भेसळकारी पदार्थ) मिसळून गाय दुधाचा साठा तयार करून ठेवल्याचे आढळले. तसेच त्याच्या घराची तपासणी केली असता २५ किलोच्या २ पिशवी व १ लूज पिशवी त्यामध्ये १४ किलो व्हे पावडर (भेसळकारी पदार्थ) असल्याचे तपासणीवेळी आढळून आले. त्यानंतर गाय दुधाचा एक नमुना घेऊन उर्वरित गाय दुध साठा ३५८ लिटर, किं.रु. ८९५०/- जप्त करुन सदर साठा नाशवंत असल्याने जागेवर नष्ट करण्यात आला. तसेच व्हे पावडर (अमूल) (भेसळकारी पदार्थ)चा नमुना घेऊन उर्वरित साठा ६४ किलो, किं. रु. ६२००/- जप्त करुन ताब्यात घेतला.

वरील अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आलेले आहे. अन्न विश्लेषकांकडून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमने 2011 नुसार पुढील घेण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांनी सांगितले.सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *