ताज्याघडामोडी

पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्यास उच्चांकी ३०५ दर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सौद्यामध्ये बेदाण्यास ३०५ रूपये किलो असा उच्चांकी दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी दिली.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर मंगळवारी व शनिवारी बेदाणा सौदे होतात. मंगळवारी तुलसी ट्रेडिंग कंपनी प्रो.विनीत अशोक बाङ्गना यांचे आडत दुकानी तालुक्यातील करकंब येथील दिगंबर रामचंद्र घाटुळे यांच्या ५० बॉक्स बेदाण्यास ३०५ रूपये प्रति किलो असा दर मिळाला. सदर माल पार्श्वनाथ ट्रेडर्स प्रो.स्वप्नील रसिक कोठाडिया यांनी खरेदी केला. यावेळी झालेल्या सौद्यावेळी बेदाण्याला १०० ते ३०५ रूपये असे दर मिळाले. आलेल्या बेदाण्याला सरासरी १७५ रूपये किलो असा दर मिळाला. यावेळी १५० गाडीची आवक होऊन १३१ गाडी बेदाण्याची विक्री झाली.

दरम्यान सध्या बेदाणा मालाला उठाव व मागणी चांगली आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी न करता ङ्गक्त आडते व व्यापारी सर्व नियम पाळून माल विक्री करीत असल्याचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले.
यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, संचालक शैलेंद्र नवाळे, सिकंदर बागवान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *