बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ […]
ताज्याघडामोडी
मंदिरे,प्रार्थनास्थळांना करावे लागणार या नियमांचे पालन
दुकानदार व्यवसायिक यांच्यासाठीही अनेक अटी लागू प्रार्थनास्थळे खुली केली जाणार असली, तरी त्यासाठी सरकारने नियमावली देखील घालून दिली आहे. त्यानुसार… १. ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरीक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. करोना नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं संबंधित प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन कर्मचारी आणि भेट देणाऱ्या नागरिकांनी पालन करायचं आहे. २. शक्य […]
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिराची दारे उघडली जाणार
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. येत्या 7 ऑक्टोबर रोजी म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मिळतेय. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री […]
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक धरणे ओसंडून वाहत आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मागील […]
सहकार उध्वस्त करू पाहणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी मनसेला साथ द्या – मनसे नेते,दिलीप धोत्रे
महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात एकेकाळी अव्वल दर्जाचा असताना आता मात्र संपायच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. सगळ्या राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजून जनतेला मात्र कुपोषित करून सोडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सहकार सेना एक नवीन सहकार पर्व करून ते स्वच्छ करण्याचे काम नजीकच्या काळात करेल. असे प्रतिपादन मनसे नेते व सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी […]
सुधारीत ओबीसी अध्यादेशावर राज्यपालांची सही, राज्यपालांनी अध्यादेश राज्य सरकारकडे पाठवला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांमध्ये मागासवर्गीय जागांचे (ओबीसी) एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही. तसेच ओबीसी प्रवर्गासाठी अधिकाधिक 27 टक्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याबाबत न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून सुधारित अध्यादेशाला संमती देण्यासाठी संबंधित अध्यादेशाचा प्रस्ताव पुनर्विचारासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे परत सादर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित […]
लसीकरणासाठी केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी; ‘… त्यांचे होणार घरीच लसीकरण’
देशात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील सुमारे ३१ हजार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोल आलं आहे. पण ज्या वेगाने रुग्णसंख्या कमी व्हायला हवी होती, ती होत नाहीए. याचा अर्थ कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत, अशी माहिती केंद्रीय […]
आयकर विभागाची मोठी करवाई; 40 ठिकाणी छापे
राज्यात आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे. पुण्यातील एका मोठ्या उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जयराज ग्रुपसह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी […]
शरद पवार यांना उद्योग व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी कार्य अहवाल केला सादर
उद्योग व व्यापार मध्ये येणाऱ्या समस्या यांची बैठक घेऊन पक्षसंघटन वाढवणे, जीएसटी संदर्भातील प्रश्न सोडवून पर्यावरण पूरक मच्छी उद्योग व व्यापार व्यवसायाला चालना देणे, तरुण वर्गांना महामंडळामार्फत इन्कम सोर्स उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या संधी देणे, वेबसाईट उपलब्ध करून पुणे शहर जिल्हा व्यापारात अग्रगण्य असल्याने जंबो कार्यकारणी तयार करणे बाबत आदि याविषयी माननीय श्री प्रशांत जगताप […]
‘2022 पर्यंत भारतात तयार होणार 100 कोटी कोरोना लसींचे डोस’
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतातील कोविड लसीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, क्वाड पार्टनरशिप अंतर्गत 2022 पर्यंत भारतात किमान 100 कोटी कोविड लस डोसचं उत्पादन केलं जाणार असून हे काम सध्या ट्रॅकवर आहे. जो बायडेन म्हणाले की, यावेळी कोविड -19 ला रोखण्यासाठी एकत्र काम करण्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं नाही. त्यामुळे भविष्यात या […]










