ताज्याघडामोडी

लसीकरणासाठी केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी; ‘… त्यांचे होणार घरीच लसीकरण’

देशात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील सुमारे ३१ हजार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोल आलं आहे. पण ज्या वेगाने रुग्णसंख्या कमी व्हायला हवी होती, ती होत नाहीए. याचा अर्थ कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

यादरम्यान, सरकारने घरोघरी लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. लस घेण्यासाठी जे केंद्रात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही घरीच लसीकरण सुरू करत आहोत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या लसीकरणातही सर्व नियमांचे पालन केले जाईल, असं पॉल यांनी स्पष्ट केलं.

देशात सलग १२ व्या आठवड्यात करोना संसर्गाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा कमी आहे. हा दर ३ टक्क्यांहूनही कमी आहे. देशात करोना संसर्गातून बरे होण्याचा दर हा ९७.८ टक्क्यांवर गेला आहे. काही राज्यांमध्ये लसीकरणावर प्रचंड काम झाले आहे. यामुळे १८ वर्षांवरील लोकसंख्येपैकी ६६ टक्के नागरिकांना करोनाचा लसीचा किमान एक तरी डोस मिळाला आहे. २३ टक्के नागरिकांना करोनावरील लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.

देशातील ६ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला आहे. यामध्ये लक्षद्वीप, चंदिगड, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि सिक्कीम यांचा समावेश आहे. देशातील ४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पहिला डोस दिला गेला आहे. यामध्ये दादरा- नगर हवेली, केरळ, लडाख आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.

देशात सलग १२ व्या आठवड्यात करोना संसर्गाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा कमी आहे. हा दर ३ टक्क्यांहूनही कमी आहे. देशात करोना संसर्गातून बरे होण्याचा दर हा ९७.८ टक्क्यांवर गेला आहे. काही राज्यांमध्ये लसीकरणावर प्रचंड काम झाले आहे. यामुळे १८ वर्षांवरील लोकसंख्येपैकी ६६ टक्के नागरिकांना करोनाचा लसीचा किमान एक तरी डोस मिळाला आहे. २३ टक्के नागरिकांना करोनावरील लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.

दशातील ६ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला आहे. यामध्ये लक्षद्वीप, चंदिगड, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि सिक्कीम यांचा समावेश आहे. देशातील ४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पहिला डोस दिला गेला आहे. यामध्ये दादरा- नगर हवेली, केरळ, लडाख आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *