ताज्याघडामोडी

सहकार उध्वस्त करू पाहणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी मनसेला साथ द्या – मनसे नेते,दिलीप धोत्रे

महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात एकेकाळी अव्वल दर्जाचा असताना आता मात्र संपायच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. सगळ्या राजकीय नेत्यांनी स्वतःची पोळी भाजून जनतेला मात्र कुपोषित करून सोडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सहकार सेना एक नवीन सहकार पर्व करून ते स्वच्छ करण्याचे काम नजीकच्या काळात करेल. असे प्रतिपादन मनसे नेते व सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी केले.

मनसे सहकार सेनेतर्फे काल( दि.२४) नाशिक जिल्ह्यातील सहकारा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी धोत्रे यांनी  जिल्ह्यातील सहकाराची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी मनसेचे आगामी धोरण या विषयावर मार्गदर्शन केले. नाशिकरोड येथील उत्सव बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले महाराष्ट्र राज्याचे परिस्थिती फार बिकट असून कृषी उत्पन्न बाजार समित्या साखर कारखाने मध्यवर्ती बँक दुग्ध उत्पादन संघ ऊसतोड कामगार हजारो शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत.

चेहऱ्यावरचे हास्य पूर्ववत होण्यासाठी सहकार सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सदैव तत्पर तत्पर असेल.महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण स्वक्षम होण्यासाठी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करेल. त्यासाठी मनसे निश्चितपणे सहाय्य करेल.असे धोत्रे यांनी सांगितले. मनसेचे सरचिटणीस अशोक मुर्तडक म्हणाले, मनसेचा महापालिकेच्या काळात आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा डाग लागू दिला नाही.राजसाहेबांनी नाशिक शहराचा कायापालट करून दाखवला आहे.

माजी गटनेते नगरसेवक सलीम शेख म्हणाले, आम्ही नाशिक मध्ये नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच ‘ शाखा अध्यक्ष तुमच्या भेटीला अभियान ‘ सुरू करत आहोत. त्यामुळे लोकांच्या अडचणी समजून घेण्यास सोपे होईल व त्यावर मार्ग काढला जाईल. शहराध्यक्ष पदावरून  जिल्हा अध्यक्ष म्हणून रुजू झालेले अंकुश पवार यांनी येणाऱ्या काळातमनसेचा झेंडा सर्वत्र फडकेल असा विश्वास व्यक्त केला.

प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी बैठकीचे स्वागत, प्रस्ताविक केले. ज्यांनी जनतेच्या सहकार क्षेत्रात दिशाभूल केली भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या त्यांना आता मनसे सहकार सेना शिष्टाचार दाखवून जिल्ह्याला न्याय देण्याचे काम करून दाखवेल असे विधान केले.

व्यासपीठावर कामगार सेनेचे बंटी कोरडे, उपजिल्हाध्यक्ष संतोष शहाणे, सरचिटणीस संतोष किल्ले, शहर समन्वयक सचिन भोसले, सहकारचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, सरचिटणीस प्रियंका शृंगारे, सचिव कौस्तुभ लिमये, जिल्हाध्यक्षा पद्मिनी वारे, विभाग अध्यक्ष विक्रम कदम, बंटी लभडे, सत्यम खंडाळे ,नितीन साळवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शामगोहाड, कौशल पाटील, सौरभ सोनवणे,सचिन सिन्हा,साहेबराव खर्जुल, प्रमोद साखरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व नाशिकरोड विभागाचे राज ठाकरे यांनी नियुक्त केलेले शाखाध्यक्ष यांचा दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सरचिटणीस विजय जाधव यांनी महाराष्ट्र सहकार सेना नाशिक शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली.सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. आभार विशाल साळवे यांनी मानले.संयोजन स्वागता उपासनी ,भाऊसाहेब निमसे, राकेश परदेशी ,अक्षरा घोडके, गौरव शिंपी सहकार सेना नाशिक शहर जिल्हा व नाशिक विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *