ताज्याघडामोडी

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना दिलासा; ठाकरे सरकारने जाहीर केली १० हजार कोटींची मदत

राज्यातल्या पूरग्रस्त तसंच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने मोठी मदत जाहीर केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्…; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये खंडणी मागायला आलेल्या तिघांच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मसाज पार्लरमध्ये येत एक लाख रुपये द्या, अन्यथा पोलिसांना बोलवू अशी धमकी दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भितीने बदनामीपासून वाचण्यासाठी गॅलरीत लपायला गेलेल्या एका महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या

पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती. तर अन्य नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला. या हत्याकांडामुळे पुण्यात […]

ताज्याघडामोडी

आमदार प्रशांत परिचारक पुन्हा आमदार होणार ?

नगर पालिका निवडणुकीपूर्वीच विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार ?   सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राजकारण तापणार असून विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार प्रशांत परिचारक यांचा कार्यकाळ १५ डिसेंबर रोजी संपत असल्याने या महिना अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करून ऑक्टोबरच्या मध्यात हि निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.डिसेंबर २०१५ मध्ये […]

ताज्याघडामोडी

परतीचा पाऊस झोडपणार! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागात 24 तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे. येत्या 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पडणार आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाच लाखाच्या लाचेची मागणी,९२ हजार स्वीकारताना वन संरक्षकास रंगेहाथ पकडले

एका वरिष्ठ स्तरीय वन अधिकाऱ्याला सोमवारी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक बळीराम तुकाराम कोळेकर (57) असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोळेकर यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना त्याच्या सेवेसाठी अनुदान मिळणार आहे. […]

ताज्याघडामोडी

लस न देताच CoWin App वर नोंदणी, 10 शिक्षक निलंबित

लस न देता COWIN वर लसीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात समोर आला आहे. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 2 जुलै रोजी हा प्रकार घडला असून तब्बल 3 महिन्यांनंतर तपासणीत एक व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलै रोजी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कामगारांना जेवण्यास बोलावले म्हणून एकावर कात्रीने वार

शशिकांत साहेबराव ऐवळे वय-28 वर्षे व्यवसाय-मजूरी रा.पळशी ता.पंढरपूर हे पळशी येथे आई-वडील-भाऊ तीन मुली असे एकत्रात राहण्यास असून मोल मजूरी करून कुटूंबाची उपजिवीका करतात. दिनांक 10/10/2021 रोजी सकाळी 8 वाजता ते सुपली येथील बागायतदार दाजी भगवान यलमार यांचे डाळींब बागेत डाळींब छाटण्यासाठी इतर ८ ते १० कामगारासह गेले होते.   दुपारी 02/00 वा.काम झाल्यावर जेवण […]

ताज्याघडामोडी

न.पा.मुख्याधिकाऱ्याच्या कारला रोपळे नजीक बुलेटस्वाराची जोरदार धडक 

बार्शी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता संजय पाटील या बार्शीहुन हुंदाई क्रेटा कार मधून पंढरपुरातील त्यांच्या निवासस्थानी परतत असताना काल रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05/00 वा.सुमारास रोपळे चौक येथे आलेले असताना मेंढापूर गावाकडून येणारे रोडने बुलेट मोटर सायकल नं.MH13DF1433 वरील चालकाने त्याचे ताब्यातील बुलेट मोटर सायकल भरधाव वेगाने चालवुन हुंदाई क्रेटा कार नं.MH09EM0600 चे उजव्या बाजुचे […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी चा 22 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 22 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सहकार शिरोमणी कारखान्याचे जेष्ठ् सभासद रेवणसिध्द् पुजारी, रा.विटे यांचे अध्यक्षतेखाली व वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे व त्यांच्या सुविद्यपत्नी डॉ.सौ.जयश्रीताई शिनगारे या उभयतांच्या शुभहस्ते आज 11 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. संपन्न्‍ झाला. यावेळी चेअरमन […]