ताज्याघडामोडी

न.पा.मुख्याधिकाऱ्याच्या कारला रोपळे नजीक बुलेटस्वाराची जोरदार धडक 

बार्शी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता संजय पाटील या बार्शीहुन हुंदाई क्रेटा कार मधून पंढरपुरातील त्यांच्या निवासस्थानी परतत असताना काल रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05/00 वा.सुमारास रोपळे चौक येथे आलेले असताना मेंढापूर गावाकडून येणारे रोडने बुलेट मोटर सायकल नं.MH13DF1433 वरील चालकाने त्याचे ताब्यातील बुलेट मोटर सायकल भरधाव वेगाने चालवुन हुंदाई क्रेटा कार नं.MH09EM0600 चे उजव्या बाजुचे पुढील चाकापासून पाठीमागे पर्यंत जोराची धडक दिली.

त्यावेळी फिर्यादी चालकाने कारचे खाली उतरून सदर बुलेट मोटर सायकल चालकाकाडे नाव पत्त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव न सांगता त्याचे बरोबरचा एक इसम व स्त्री असे त्यांचे मोटर सायकलवरून निघुन गेले.

सदर अपघातामध्ये आमचे कारचे उजव्या बाजुची मोडतोड होवुन सुमारे 80000/-रुपयाचे नुकसान झाले आहे.अशा आशयाची फिर्याद सदर अपघातग्रस्त हुंदाई क्रेटा चालक विकास बाळु डांगे यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *