ताज्याघडामोडी

लस न देताच CoWin App वर नोंदणी, 10 शिक्षक निलंबित

लस न देता COWIN वर लसीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात समोर आला आहे. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 2 जुलै रोजी हा प्रकार घडला असून तब्बल 3 महिन्यांनंतर तपासणीत एक व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलै रोजी लसीकरण करण्यात आले होते. या केंद्रावर 1 व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आले होते. व्हायल शिल्लक कशी राहिली याची तपासणी करण्यात आली असता केंद्रावर कार्यरत असलेल्या 10 शिक्षकांनी 13 लाभार्थ्यांना लस न देताच लस देण्यात आल्याची नोंद केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कर्त्यव्यात कसूर करून राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

या 10 शिक्षकांना शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एफ. डब्ल्यू चव्हाण यांनी निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढला आहे. एकाच वेळी 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 11 ऑक्टोबर 2021 पासून या शिक्षकंना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन रद्द करण्याची मागणी

शाळेच्या 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्वच्या सर्व 10 शिक्षकांचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे. त्या संदर्भात त्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना एक पत्रकही दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *