

शशिकांत साहेबराव ऐवळे वय-28 वर्षे व्यवसाय-मजूरी रा.पळशी ता.पंढरपूर हे पळशी येथे आई-वडील-भाऊ तीन मुली असे एकत्रात राहण्यास असून मोल मजूरी करून कुटूंबाची उपजिवीका करतात. दिनांक 10/10/2021 रोजी सकाळी 8 वाजता ते सुपली येथील बागायतदार दाजी भगवान यलमार यांचे डाळींब बागेत डाळींब छाटण्यासाठी इतर ८ ते १० कामगारासह गेले होते.
दुपारी 02/00 वा.काम झाल्यावर जेवण करण्यासाठी सर्वजण एकत्र बसले असता सोबत काम करणार पोपट आजिनाथ वाघमारे याने शशिकांत साहेबराव ऐवळे यास बाकीच्या कामगारांना जेवण्यासाठी का बोलविले म्हणून शिवीगाळी करण्यास सुरुवात केली.तेव्हा फिर्यादीने शिवीगाळी करू नकोस असे म्हणत असताना पोपट आजिनाथ वाघमारे रा-पळशी ता-पंढरपुर याने डाळींब बाग छाटण्याचे कात्रीने फिर्यादीच्या पाठीत मारली त्यामुळे पाठीतून रक्त येवू लागले व लाथाबुकक्यानी मारहाण करून शिवीगाळी करू लागला त्यावेळी तेथे उपस्थित कामगार शहाजी ऐवळे भांडणे सोडवा सोडवी केली .
सदर घटनेत जखमी झालेल्या फिर्यादीस उपचाराकरिता उपजिल्हा रूग्णालय येथे शहाजी ऐवळे व नामदेव कोळी यांनी दाखल केले आहे.या प्रकरणी बाकीच्या कामगारांना जेवण्यास का बोलाविले म्हणून शिवीगाळी करून लाथाबुकक्यानी मारहाण करत हातातील बाग छाटनीचे कात्रीने पाठीत मारले अशा आशयाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.