ताज्याघडामोडी

पंतप्रधान मोदींनी प्रवाहाविरुद्ध जाऊन सगळ्यांना वेगाने हालचाल करायला लावली,“मोदींशिवाय हे शक्यच नव्हतं”

  #WATCH | "…PM went out of his way, made everyone move very fast… Had it not been for him… and driving the health ministry, today India would not have been able to make a billion doses….: Cyrus Poonawalla, Serum Institute, after meet with PM Modi. (Source: PMO) pic.twitter.com/UpxV55yjNR — ANI (@ANI) October 23, 2021 […]

ताज्याघडामोडी

पतसंस्थांमधील ५० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना बँकांप्रमाणे संरक्षण मिळणार

बँकांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना ज्या प्रमाणे संरक्षण देण्यात आले आहे, त्याच धर्तीवर पतसंस्थांमधील ५० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींनाही संरक्षण देण्यासाठी सहकार विभागाने आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. पतसंस्थांमध्ये सामान्य नागरिकांच्या, छोट्या व्यावसायिकांच्या ठेवी असतात. अशा ठेवीदारांचा विचार करून सहकार विभागाने केरळ राज्याच्या धर्तीवर राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांना संरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र सहकार […]

ताज्याघडामोडी

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले २५ कोटी घबाड

नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने कारवाई करत १० ते १५ घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाने तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली.आयकर चुकवलेल्या व्यापऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत करण्यात आले आहेत. देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक मध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. यात कांदा […]

ताज्याघडामोडी

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याकडेच लाच मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रायगडमधील अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून एका पोलीस हवालदाराकडेच ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. लाच विभगातील अधिकाऱ्याकडेच लाच मागितल्यामुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दुपारच्या सुमारास लाचलुचपत कार्यालयात घुसून अरुण बेलोसकर नामक व्यक्तीने जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप अधिकारी […]

ताज्याघडामोडी

उदयनराजे भोसले यांची संतप्त फेसबुक पोस्ट

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतप्त फेबसुक पोस्ट लिहिली आहे. तसेच या फेबसुक पोस्टमध्ये त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नेत्यांची पुण्यात बैठक झाली. यावर उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुकवर संतप्त पोस्ट लिहिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली, महिनाभर सोबत राहिली, अचानक रात्री दोघांचाही गळफास!

बुलडाण्याची जिल्ह्यातील विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली. त्याच्यासोबत एक महिना राहिलीही पण दोघांमध्ये मधल्या काही दिवसांत काय झालं माहिती नाही, अचानक राहत्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. नेमकं काय घडलं? बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील 24 वर्षीय विवाहिता शीतल सपकाळ ही पती आणि पोटच्या दोन मुलांना सोडून गावातीलच तिच्या प्रियकरासोबत महिनाभरापूर्वी पळून गेली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

निर्दयी आईनं केली तीन महिन्यांच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या

उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका निर्दयी आईनं आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकलं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीला कसं मारायचं हे आईनं गुगलवर सर्च केलं होतं. निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे. आईनं गुगलवर सर्च करुन मुलीच्या हत्येचा कट रचला. ही घटना उज्जैनच्या खाचरोड भागातील आहे. येथे राहणाऱ्या भटेवरा कुटुंबातील तीन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीवर फेकले उकळते तेल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्यावर उकळते तेल फेकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.भावना सतीश भिमटे (वय ३१) असे जखमी महिलेचे तर सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. भावनाचे विवाहबाह्य संबंध असल्यचाचा सतीषला संशय होता. यावरून त्यांच्या नेहमीच वाद […]

ताज्याघडामोडी

छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष

वारंवार होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. विष प्राशन करत या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात गुंडाच्या दोन टोळयामध्ये गोळीबार

पुण्यात लोणी काळभोर भागात शुक्रवारी दुपारी उरुळी कांचनच्या तळवडे चौकात भीषण गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमीला पुण्याच्या ससून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, हा गोळीबार अप्पा लोंधे टोळी आणि त्याच्यांविरुद्धच्या टोळीमध्ये झाला. त्यामुळे पोलीस याला एक गॅंगवार मानत असून तपास सुरु […]