ताज्याघडामोडी

छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष

वारंवार होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. विष प्राशन करत या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड काढत असे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने यासंदर्भात आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली होता.

या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *