नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने कारवाई करत १० ते १५ घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाने तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली.आयकर चुकवलेल्या व्यापऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत करण्यात आले आहेत. देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक मध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. आगामी काळात आयकर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या आणि पैसा वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.