गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

निर्दयी आईनं केली तीन महिन्यांच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या

उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका निर्दयी आईनं आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकलं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीला कसं मारायचं हे आईनं गुगलवर सर्च केलं होतं. निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे.

आईनं गुगलवर सर्च करुन मुलीच्या हत्येचा कट रचला. ही घटना उज्जैनच्या खाचरोड भागातील आहे. येथे राहणाऱ्या भटेवरा कुटुंबातील तीन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. मुलीच्या हत्येचा संशय मुलीच्या आईवर होता आणि तो संशय खरा निघाला.

गुगलवर सर्च केला हत्येची पद्धत

12 ऑक्टोबर रोजी खळबळजनक हत्ये प्रकरणात पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 3 महिन्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या आईला अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपी आईनं गुगलवर सर्च केलं की, मुलीला बुडवून कसं मारता येईल. अखेर 12 ऑक्टोबर रोजी आईनंच मुलीची हत्या केली. सोशल मीडियावर मुलांना मारण्याचा माहिती शोधत असल्याचं समजल्याचं कळताच पोलिसांनी आईला अटक केली. मात्र, यापूर्वी पती अर्पित, सासू अनिता आणि सासरे सुभाष भटेवरा यांनी मुलीची आई स्वातीवर हत्येचा संशय व्यक्त केला होता.

बेपत्ता होती मुलगी

खाचरौद असलेलं स्टेशन रोड येथील रहिवासी अर्पित भटेवरा यांची 12 ऑक्टोबरच्या दुपारी तीन महिन्याची मुलगी विरती बेपत्ता झाली होती. अर्पितने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. शोधाशोध केली असता घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये विरतीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाची बारकाईनं तपासणी केली असता विरतीला तिची आई स्वाती भटेवरा (28) हिने पाण्याच्या टाकीत फेकल्याचं समोर आलं. स्वातीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. स्वाती आणि अर्पितचं लग्न फेब्रुवारी 2019 साली झालं होतं.

एएसपी आकाश भुरिया यांनी सांगितलं की, विरती 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.20 ते 1.40 च्या दरम्यान घरातून बेपत्ता झाली. त्यावेळी अर्पित घराच्या खाली असलेल्या दुकानात होता. वडील काही वेळापूर्वी बाहेर गेले होते. घरात स्वाती आणि तिची सासू अनिता भटेवरा वगळता कोणीच नव्हते. चौकशीत स्वाती संशयाच्या भोवऱ्यात अडकली गेली. असं आढळून आलं की, तिनं मोबाईलमध्ये 10 ऑक्टोबर रोजी इंटरनेटवर शोधलं होतं की पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू कसा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *