एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून घेण्यासाठी एकीकडे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दिवाळीच्या दिवळी बीडमध्ये घडली आहे. नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बीड जिल्ह्यात कडा बस स्थानकावर ही घटना उघडकीस आली. बाळू महादेव कदम […]
ताज्याघडामोडी
दीड हजार किलो बनावट खवा जप्त
पावडरपासून भेसळयुक्त खवा तयार करणाऱ्या तीन कंपन्यावर छापा टाकून अन्न व औषध विभागाने कोल्हापूरात दीड हजार किलो बनावट खवा जप्त केला. वीस लाखाचा हा माल जप्त करतानाच तीनही कंपन्यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईने जिल्ह्यात भेसळयुक्त खवा तयार करण्याचे प्रमाण फार मोठे असल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खवा तयार […]
अनिल देशमुख आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर चालवत होते 27 कंपन्या, यामध्ये अनेक बनावट कंपन्या; ईडीच्या तपासात खुलासा
सुमारे 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या अटकेनंतर एक नवीन खुलासा झाला आहे की, ईडीला अशा 13 कंपन्यांविषयी माहिती मिळाली आहे, ज्या अनिल देशमुख, त्यांचे मुलं सलिल आणि ऋषिकेशच्या थेट कंट्रोलमध्ये होत्या. यासोबतच 14 अशा कंपन्या आहेत, ज्या अनिल देशमुखांच्या नीकटवर्तीयांच्या कंट्रोलमध्ये सुरू होत्या. ईडीच्या […]
अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी अजून कोणतेही पुरावे नाहीत – परमबीर सिंग
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितलंय. आयोगाच्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली. या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने […]
महाविद्यालयातील कर्मचारी प्रतिक काळे यांची आत्महत्या
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील क्रमचारी प्रतिक काळे या तरुणानं आत्महत्या केलीय. 30 ऑक्टोबर रोजी प्रतिक काळेनं आत्महत्या केलीय. महत्वाची बाब म्हणजे प्रतिक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावं घेतली आहेत. त्या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचं आणि […]
दोन महिन्यापूर्वी फेसबुकवर मैत्री
ल्हेरमध्ये 19 वर्षीय तरुणी बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील झाशीची रहिवासी असून ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होती. यावेळी एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुण आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर […]
युवासेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी चेतन नेहतराव यांची निवड
शिवसेना प्रणित युवासेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी चेतन मुकूंद नेहतराव यांची निवड करण्यात आली असून शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते त्यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रवी मुळे,युवासेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,एसटी कामगार सेना अध्यक्ष विनय वनारे,उपशहर प्रमुख पोपट सावंतराव,एसटी कामगार सेना अध्यक्ष नितीन कोडक(सांगोला),विभागीय […]
अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, वकिलांचा खुलासा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, अजित पवारांच्या वकिलाने खुलासा केला आहे. तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर […]
दिवाळीमुळे राज्यातील बँका ‘या’ दिवशी राहणार बंद
दिवाळीनिमित्त मुंबईसह देशभरातील बँकांना पुढील काही दिवस सुट्टी असेल. मात्र, प्रत्येक राज्यानुसार या सार्वजनिक सुट्ट्या बदलतील. सर्व राज्यांमधील देण्यात येणाऱ्या प्रादेशिक सुट्ट्ट्यांचा विचार करायचा झाल्यास दिवाळीच्या काळात बँका पाच दिवस बंद राहतील. बुधवार ते रविवारी या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिवाळीची सुट्टी असेल. महाराष्ट्रातील बँकांना नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडव्यासाठी 4 नोव्हेंबर आणि 5 […]
मी लस घेतली नाही, घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांच अजब वक्तव्य
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी करोना लसीबाबत केलेल्या विधानाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात […]











