

शिवसेना प्रणित युवासेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी चेतन मुकूंद नेहतराव यांची निवड करण्यात आली असून शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते त्यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रवी मुळे,युवासेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,एसटी कामगार सेना अध्यक्ष विनय वनारे,उपशहर प्रमुख पोपट सावंतराव,एसटी कामगार सेना अध्यक्ष नितीन कोडक(सांगोला),विभागीय सचिव संजय गंगणे,सचिव गणेश पवार,अक्षय नेहतराव,प्रवीण माने,अरिफ शेख,अक्षय माने आदी उपस्थित होते.
या निवडीनंतर बोलताना युवा सेनेचे नूतन शहर उपप्रमुख चेतन नेहतराव यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून युवा सेनेच्या माध्यमातून काम करीत असताना सर्वसामान्य जनता,असंघटीत खाजगी कामगार,अंध अपंग यांच्या प्रश्नासाठी आपण सदैव तत्परतेने कार्यरत राहून शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे प्रश्न सोडविण्यासाठी परिश्रम करू अशी ग्वाही दिली.या निवडीनंतर चेतन नेहतराव यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.