ताज्याघडामोडी

दिवाळीमुळे राज्यातील बँका ‘या’ दिवशी राहणार बंद

दिवाळीनिमित्त मुंबईसह देशभरातील बँकांना पुढील काही दिवस सुट्टी असेल. मात्र, प्रत्येक राज्यानुसार या सार्वजनिक सुट्ट्या बदलतील. सर्व राज्यांमधील देण्यात येणाऱ्या प्रादेशिक सुट्ट्ट्यांचा विचार करायचा झाल्यास दिवाळीच्या काळात बँका पाच दिवस बंद राहतील. बुधवार ते रविवारी या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिवाळीची सुट्टी असेल. महाराष्ट्रातील बँकांना नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडव्यासाठी 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरला सुट्टी असेल. भाऊबीजेची सुट्टी ही वैकल्पिक असेल.

सुट्ट्यांचा कालवधी काय?

देशभरात नरक चतुर्दशी, दिवाळी, काली पूजा, गोवर्धन पूजा, भाईदूज या सणांच्या निमित्ताने आजपासून म्हणजेच 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत बँकांना सुट्टी असेल. पण या सुट्ट्या सलग नसतील. म्हणजेच, देशातील काही भागात बँका काही दिवशी बंद राहतील आणि इतर भागात खुल्या राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या यादीत या सुट्ट्या आहेत.

या दिवसात तुम्हाला बँकेत काही काम असेल, तर तुमच्या परिसरात बँका बंद आहेत की नाही याची माहिती घेऊनच बाहेर पडा. कॅलेंडरनुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात.

प्रादेशिक सुट्ट्यांचे वाटप कसे?

गुरुवारी नरक चतुर्दशी आहे.  दिवाळी आणि कालीपूजेमुळे देशातील बहुतांश भागात बँका बंद राहतील. गोवर्धन पूजेनिमित्त शुक्रवार, 5 नोव्हेंबर रोजी अनेक भागात बँका बंद राहणार आहेत. यानंतर शनिवारी भाऊबीजेसाठी काही भागात बँका बंद राहतील. यानंतर 7 नोव्हेंबर हा रविवार असून त्या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत. अशा प्रकारे सलग पाच दिवस बँकांना कुठे ना कुठे सुट्टी असेल.

दिवाळीनंतरही बँकांना अनेक सुट्ट्या

पाटणा आणि रांचीमध्ये 10 नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्याचवेळी

11 नोव्हेंबर रोजी छठ पूजेच्या निमित्ताने पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
12 नोव्हेंबरला वांगला उत्सवानिमित्त शिलाँगमधील सर्व बँका बंद राहतील.
19 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेला आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
22 नोव्हेंबरला कनकदास जयंतीला बंगलोरमध्ये बँका सुरू नसतील.
23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नमच्या निमित्ताने शिलाँगमधील बँका बंद राहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *