गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महाविद्यालयातील कर्मचारी प्रतिक काळे यांची आत्महत्या

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील क्रमचारी प्रतिक काळे या तरुणानं आत्महत्या केलीय. 30 ऑक्टोबर रोजी प्रतिक काळेनं आत्महत्या केलीय. महत्वाची बाब म्हणजे प्रतिक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावं घेतली आहेत. त्या नावांमध्ये मंत्री   शंकरराव गडाख यांचं आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही ही नाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय. 

प्रतिक काळे या तरुणाने 10 नावं घेतली. त्यातील 7 नावांवर एफआयआर दाखल केली. त्यातील 3 नावांवर मात्र पोलिसांनी आळीमिळी गुपचिळी साधली. जलसंधारण खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांच्यासारख्या नेत्याचं नाव घेऊन एक तरुण आत्महत्या करतोय. 30 तारखेला ही घटना घडलीय. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात अत्यंत अस्वस्थ वातावरण आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची चर्चा तिथे सुरु आहे. हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, असा गंभीर आरोप उपाध्ये यांनी केलाय.

दंत महाविद्यालयात काम करणाऱ्या प्रतिक काळे यानं चार दिवसांपू्र्वी औरंगाबाद रोडवरील झाडीत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ व्हायरल करत आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. प्रतिक काळे हा काही वर्ष प्रशांत गडाख यांचे सहाय्यक म्हणून काम पाहिल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केल्याचीही माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *