ताज्याघडामोडी

आळंदीला निघालेल्या वारकरी दिंडीत घुसला भरधाव टेम्पो; २० जखमी

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्तिकी एकादशीच्या वारीला आळंदीला पायी जाणाऱ्या एका वारकरी दिंडीत भरधाव टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात २० वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.

ताज्याघडामोडी

कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 50 हजारांची मदत

राज्यात गेल्या दीड वर्षात लाखो लोकं बाधित झाली, अनेक लोकांचे मृत्यू झाले. अनेक कुटुंब उद्धव्स्त झाली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या कुटुंबासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार […]

ताज्याघडामोडी

तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे केल्याने; गावकऱ्यांचा तलाठ्याला चोप

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठ्याने कार्यालयातचा एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे. यामध्ये तल्याठ्याच्या मित्रांचाही समावेश होता. हा सर्व प्रकार उघड होताच गावकऱ्यांनी तलाठ्यासह त्याच्या मित्रांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. तर काही विकृत मित्र हे पळून गेले. या प्रकरणी गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  व्ही भगत […]

ताज्याघडामोडी

धर्मांतर केले तरी जात बदलत नाही! मद्रास हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

कुठल्याही धर्मातील व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारला अर्थात धर्मांतर केले तरी त्या व्यक्तीची जात बदलत नाही. त्यामुळे धर्मांतराच्या आधारे आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती एस. एस. सुब्रमण्यम यांनी नुकताच हा निकाल देताना धर्मांतराच्या आधारे आंतरजातीय विवाह प्रमाणपत्राची मागणी करणाऱया एस. पॉल राज यांची रिट […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेण्यास नकार दिल्याने अधिकाऱ्याच्या कार्यालयात उधळले पैसे, ऑफिसरने काढला पळ

सरकारी कार्यालयातील काम करुन देण्यासाठी अधिकारी लाचेची मागणी करत असतात. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने कार्यालयातून पळ काढला. झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार […]

ताज्याघडामोडी

वऱ्हाडींचं स्वागत करतानाच फुटलं कॉफी मशीन, स्फोटात एकाचा मृत्यू; अनेक जखमी

लग्नसमारंभात पाहुणे मंडळी जमली असताना अचानक कॉफीच्या मशीनचा स्फोट झाल्यामुळे एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लग्न समारंभात खाण्यापिण्याची जबाबदारी एका कंत्राटदाराला देण्यात आली होती. त्यानं कॉफीसाठी आणून ठेवलेल्या मशीनमधून अनेकजण कॉफी घेतही होते. मात्र अचानक जोरदार धमाका होत हे मशीन फुटलं आणि लग्नसमारंभावर शोककळा पसरली. अशी घडली दुर्घटना मध्यप्रदेशातील जबलपूरजवळच्या रिठोरी गावात सीताराम […]

ताज्याघडामोडी

चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनंतर आता शरद पवारही दिल्लीत दाखल

राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यापूर्वीच दिल्लीत आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहोचल्यानंतर आता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लॉजवर विवाहितेची हत्या तर तरुणाची साडीने गळफास घेत आत्महत्या

पुण्यात काही झालं तरीही गुन्ह्यांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आजही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. दिघी येथे एका लॉजमध्ये महिलेचा गळा आवळून स्वतः आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता समोर आला असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं […]

ताज्याघडामोडी

आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

कामगारांच्या वेतनात ४१ टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता एस टी कामगारांनी एक पाऊल मागे घेत आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित केले आहे.आमदार गोपीनाथ पडळकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली असून विलिनीकरण होईपर्यंत लढा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. एस टी कर्मचार्‍याचे शासकीस कर्मचार्‍यांमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. आझाद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नाशिकमध्ये भाजप नेत्याची हत्या, परिसरात खळबळ

हत्यामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. नाशकात पाच दिवसात तिसरा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अमोल यांना फोन करून बाहेर बोलावून घेतलं. त्यानंतर सपासप वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजकीय पूर्ववैमनस्यातून […]