ताज्याघडामोडी

चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनंतर आता शरद पवारही दिल्लीत दाखल

राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यापूर्वीच दिल्लीत आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहोचल्यानंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय गोटात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपले मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करुन अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दिल्लीत असलेल्या चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरू आहे. त्यातच शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा हा दौरा यांचा संबंध नाहीये. असं सांगितलं जात आहे की, विरोधकांची दिल्लीत बैठक आहे आणि या बैठकीत सहभागी होण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार या राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचे मुंबईत काही कार्यक्रमम होते मात्र, त्यांनी ते रद्द करत दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप नेतेही दिल्लीत आहेत. राजकारणात सधी काय होईल याचा अंदाज वर्तवण्यात येऊ शकत नाही. शरद पवार दिल्लीत आल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या दौऱ्यात वेगळं काही समीकरण होतं का हे पहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *