सोलापूर जिल्ह्यात 706 ग्रामपंचायती मध्ये प्लास्टीक बंदीचे ठराव घ्या. ग्रामसेवकांनो कामात हयगय करू नका. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सोलापूर जिल्हा टाॅपवर आणा. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक व तालुकास्तरीय अधिकारी व क्षेत्राीय कर्मचारी यांची आॅनलाईन व्हीसी द्वारे बैठक घेणेत आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर सिंहगडच्या तब्बल २२१ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत कंपनीत निवड
पंढरपूर:विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्च शिक्षित व शिस्त प्रिय अनुभवी प्राध्यापक, जगातील नामवंत कंपनीत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोक-या याशिवाय पंढरपुर सिंहगडचे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम. या सर्व गोष्टीमुळे पंढरपुर सिंहगडला नॅशनल अँक्रिडिटेशन अॅण्ड असेसमेटं कौन्सिल म्हणजे नॅक समिती कडून […]
राज्यातील सहकारी बँकांना राज्य सरकारचा दणका
राज्यातील सहकारी बँकांमध्ये वाहन चालक,शिपाई,वाचमन हे पदे वगळता पदांसाठी नोकर भरती करताना सहकार विभागाने तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून नोकर भरती करण्यात यावी असे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने आज काढले आहेत. शासनाच्या या आदेशामुळे राजकीय नेते,पदाधिकारी आदींशी संबंधित असलेल्या अनेक बँकाच्या नोकर भरतीत मोठी वशिले बाजी होत होती,अनेक ठिकाणी संचालक मंडळातील […]
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) […]
तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांची आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ४० वर्षीय तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण बोराटे (वय ४१,रा.सातारा गाव) असे आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव असल्याची माहिती सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. […]
राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबरमध्ये एकही मृत्यू नाही
यंदाच्या वर्षांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पाऊल असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. राज्यात अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत डेल्टाचा प्रभाव सर्वाधिक होता, […]
राज्यात प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार, राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
कोरोनाचा नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. त्यातच येत्या दोन दिवसात राज्यात प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे व्हेरिएंट आढळल्यानंतर शाळा सुरु होणार की नाही यासाठी संभ्रम निर्माण झाला. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती […]
‘लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’, मुख्यमंत्र्यांचं आवाहन; प्रशासनाला महत्वाचे आदेश
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. ओमिक्रॉन असं या विषाणूनचं नाव आहे. हा विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्वाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला […]
चार वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह,तरुणाने केली आत्महत्या
जळगाव : शहरात चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाने सुसाईड नोट लिहून आज रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज उखर्डू खाचणे (वय २७, रा. गोपाळपुरा) असं मृत तरुणाचं नाव आहे. पत्नी, सासू, सासरे आणि पत्नीच्या भावाकडून मिळणाऱ्या धमक्या आणि होणाऱ्या त्रासामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. पंकज खाचणे याचे आयटीआयचे शिक्षण झाले होते. तो […]
राज्यात लग्नसोहळ्यांसाठी नवी नियमावली, उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेत महाराष्ट्र सरकारने दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराशी संबंधित धोक्याची आधीच सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर वेळ न घालवता राज्यातील जनतेसाठी नवीन निर्बंध आणि नियमांची यादी जारी केली आहे. म्हणजेच यावेळी ओमिक्रॉनने महाराष्ट्राला हजेरी लावण्यापूर्वीच कोरोनाच्या नवीन प्रकाराला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमांमध्ये […]











