ताज्याघडामोडी

रटाळ कामे किती दिवस करीत बसणार आहात,गावात नाविन्य पुर्ण कामे करा- सिईओ दिलीप स्वामी

सोलापूर जिल्ह्यात 706 ग्रामपंचायती मध्ये प्लास्टीक बंदीचे ठराव घ्या. ग्रामसेवकांनो कामात हयगय करू नका. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सोलापूर जिल्हा टाॅपवर आणा. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक व तालुकास्तरीय अधिकारी व क्षेत्राीय कर्मचारी यांची आॅनलाईन व्हीसी द्वारे बैठक घेणेत आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी जावेद शेख, प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्सात ७०६ ग्रामपंचायती मघ्ये प्लाॅस्टीक बंदीचे ठराव घ्या. अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. माझी वसुंधरा अभियानाचे ७०६ गावात कार्यक्रम चालू ठेवा. रटाळ कामे किती दिवस करीत बसणार आहात. गावात नाविन्य पुर्ण कामे करा. जिल्हात स्वच्छ भारत मिशन मधून १२ ठिकाणी प्लास्टीक संकलन केंद्र उभारणेत येत आहेत. प्लास्टिक बंदी करीत असलो तरी जमा झालेले व शिल्लक प्लास्टिक याचे देखील संकलन करणेत येत आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा तो एक भाग आहे.
प्रत्येक पंचायत समिती स्तरावर महिलांसाठी चांगले शौचालय बांधा. महिलांसाठी लहान बाळांना दुध पाजणेसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्या. अशा प्रकारचे कक्ष तयार करायचे आहेत. निधीची काळजी करू नका. नवीन वर्षात सीएसआर मधून आपण हिरकणी कक्ष तयार करणार आहेत. याची पुर्व तयारी करून घ्सा. महिलांना अनेक बिकट प्रसंगास सामोरे जावे लागते. आपले समवेत काम करणारे महिला भगिनींसाठी सोय करा. आपल्या जिल्ह्यातील महिलांसाठी शौचालय होणे अपेक्षित आहे. मने जीवंत ठेवा. दहा हजार लोकांनी नवीन कल्पना द्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत इमारत योजना आहे. येत्या मार्च चे आत प्रस्ताव देऊन कामे करावी लागतील.
इमारत नसलेल्या अंगणवाडी यांना नवीन इमारत सुचवा. तात्काळ प्रस्ताव द्या. प्रत्येक तालुक्यांतून एक माॅडेल गाव तयार करा. या साठी तालुका स्तरावर दहा गावे निवडून त्यांवर काम चालू करा.
प्रत्येक तालुक्यांत एक वाॅर रूम तयार करा. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, लसीकरण, महाआवास योजने मघ्ये अपुर्ण घरकुलांची संख्या खुप आहे ती पुर्ण करा. आपलेतील लोक खुप चांगले काम करतात. काही लोक काम करत नसलेमुळे कामात असंतुलित निर्माण होते.
सर्व पॅरामीटर कमी असलेले गटविकास अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसा देणार आहे. सेवा पुस्तकात नोंद घेणार आहे. मला कारवाई करणे शिवाय पर्याय नाही. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी ठामपणे सांगितले.
सर्व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करणेचे दृष्ट्रीने नियोजन करा.जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची माहिती दिली.

जिल्ह्यात ११२३८ घरकुल अपुर्ण – अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
…………………..
सोलापूर जिल्ह्यात ११२३८ घरकुल अपुर्ण आहेत. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सांगेला, मंगळवेढा व माळशिरस या तीन तालुक्यांत सर्वात कमी काम आहे. डिसेंबर पर्यंत डेडलाईन आहे. सर्र्व गाव पातळींवर ग्रामसेवक यांनी लक्ष द्यावे. बचतगटांना बॅंक लिंकेज करा. जिल्ह्यातील अपुर्ण घरकुले पुर्ण करा. स्वावलंबन योजनेतील विहीरीची कामे पुर्ण करा. जिल्हयात पशुसंवर्धन मध्ये जनावरांना ५ लाख जनावरांचे लसीकरण केले आहे. ड सुर्वेक्षण सोलापूर जिल्हा पुणे जिल्हंयात मागे आहे. स्थळ पाहणी करा. दहा दिवसात ड सर्वेक्षण चे कामे पुर्ण करा. आझादी चा अमृतमहोत्सव कार्यक्रम पुर्ण करा. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये कुचराई करणारेवर कारवाई करणार आहे. सर्व इमारतींवर आझादी चा अमृत महोत्सव चा लोगो काढा अशा सुचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केल्या.

बैठकीतील ठळक वैशिष्ट्ये –
………………………

✅ स्वच्छ सर्वेक्षण 2021 अॅप वर अभिप्राय द्या
✅ महिला साठी स्वतंत्र हिरकणी कक्ष स्वच्छतागृहा ची व्यवस्था
✅ माझी वसुंधरा चे ७०६ गावात प्लास्टीक बंदीचे ठराव
✅ ११ हजार अपुर्ण घरकुले पुर्ण करा
✅ कमी काम असलेले गटविकास अधिकारी यां ा कारणे दाखवा नोटीसा
✅ अंगणवाडी व ग्रामपंचायतीच इमारती साठी प्रस्ताव द्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *