राज्यातील सहकारी बँकांमध्ये वाहन चालक,शिपाई,वाचमन हे पदे वगळता पदांसाठी नोकर भरती करताना सहकार विभागाने तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून नोकर भरती करण्यात यावी असे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने आज काढले आहेत.
शासनाच्या या आदेशामुळे राजकीय नेते,पदाधिकारी आदींशी संबंधित असलेल्या अनेक बँकाच्या नोकर भरतीत मोठी वशिले बाजी होत होती,अनेक ठिकाणी संचालक मंडळातील व्यक्तींच्या कुटूंबातील,नात्यातील लोकांचा नोकरी भरती करताना प्राधान्याने विचार केला जातो.हे कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालकांच्या मर्जीतील असल्यामुळे बँकेत वशिले बाजी आणि गैरकारभार होत असताना मौन बाळगून राहतात असाही आरोप सातत्याने होत आला असून गेल्या काही महिन्यात राज्यातील अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या,रिझर्व्ह बँकेने कारवाई केली अशा काही बँकांतील आर्थिक घोट्याळ्यात कर्मचारी वर्गाने केलेले दुर्लक्ष हेही एक कारण असल्याचे समोर आले आहे.तर अनेक बँकाच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचेही आरोप होताना दिसून येतात.त्यामुळे सहकारी बँकाच्या नोकर भरती बाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली जात होती.
आज शासनाने या बाबत आदेश काढला असून भरती परीक्षेसाठी लेखी व मौखिक परीक्षा घेतील जाणार असून सहकार विभाग यासाठी एका एजन्सीच्या माध्यमातून हि परीक्षा पडणार आहे.मात्र बँकेच्या व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक आदी पदासाठी बँकेस थेट नियुक्तीचे अधिकार कायम राहणार आहेत.