पंढरपूर:विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्च शिक्षित व शिस्त प्रिय अनुभवी प्राध्यापक, जगातील नामवंत कंपनीत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोक-या याशिवाय पंढरपुर सिंहगडचे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम.
या सर्व गोष्टीमुळे पंढरपुर सिंहगडला नॅशनल अँक्रिडिटेशन अॅण्ड असेसमेटं कौन्सिल म्हणजे नॅक समिती कडून “ए” ग्रेड मिळालेल्या कोर्टी (ता. पंढरपूर) महाविद्यालयांची प्लेसमेंट मध्ये दमदार वाटचाल केली असून २२१ हून अधिक विद्यार्थ्यांची जगातील नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कोरोना कालावधीत एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती मध्ये विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त व उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कौशल्य, शैक्षणिक गुणवत्ता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
या निवडी मध्ये पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील टीसीएस-३५, एक्सेंचर-३४, काॅग्निझंट-५१, विप्रो-२५, इमफॅसिस-१०, बायजू-८, एमडाॅक्स- २, एमपीसीसी-१० आणि इतर नामांकित कंपनीत- ४६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड झाली असुन विविध नामांकित कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कंपनीकडून वार्षिक ३.५ लाख ते 10 लाख पर्यंत वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या निवडीमुळे पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचा स्वतंत्र विभाग असून भविष्यात जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना नामंकित व उत्कृष्ट कंपनीत नोकरी देण्यासाठी ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभाग प्रयत्न करणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे,उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.