राज्यात वीज बिल थकित असल्यामुळे कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ऊर्जा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. नुकतीच पेरणी झालेली, गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीज कनेक्शन कापलं जात असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऊर्जा विभागाच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. भाजपच्या या भूमिकेवर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत चांगलेच […]
ताज्याघडामोडी
केंद्र सरकारचा आक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचा आदेश राज्य सरकार मागे घेणार
केंद्र सरकारच्या पत्रानंतर मंगळवारी रात्री उशिरा काढलेला आदेश राज्य सरकारने मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू असणारा आदेश मागे राज्य सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार महाराष्ट्रात इतर राज्यातून एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोव्हिडं चाचणी निगेटीव्ह असतानाही 14 दिवस होम कोरंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई […]
LPG सिलेंडर पुन्हा १०० रुपयांनी महागला
एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी […]
निवडणूक सभेत भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण
कर्नाटकातील आगामी निवडणुकांसाठी भाजपची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीत वातावरण चांगलच तापलं. यावेळी आधी वादावादी झाली. दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रकरण तुफान हाणामारीपर्यंत गेलं आणि राडा झाला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री के. गोपालय्या यांनी ही बैठक आयोजित केली होती. डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथे ही बैठक बोलावण्यात आली होती. कर्नाटकचे […]
पंढरपूर शहरातील शासकीय कार्यालये,हॉटेल,बँका,दुकाने आदी ठिकाणी दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
यापुढील काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरिता आज पंढरपूर नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी अरविंद माळी यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व शहरातील व्यापारी कमेटी, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेसोबत बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार चर्चा करण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या. शहरातील सर्व शासकीय कार्यालये, बँका, आस्थापने, हॉटेल, मंगल […]
ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लसीचा प्रभाव किती ?
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच कोविडवरील उपलब्ध लसपैकी कोणती लस सर्वात प्रभावी ठरू शकते, याची चाचपणी सुरू झाली असून सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या काही आठवड्यांत सर्वांसाठीच आनंदाची बातमी देण्याचे संकेत पूनावाला यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा प्रतिकार करण्यात कोव्हिशील्ड लस किती प्रभावकारी ठरू शकते, हे […]
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कृष्णात माळी
जिल्हा कार्याध्यक्षपदी कृष्णात माळी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी ही निवड केली आहे. कृष्णात माळी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची पक्षाने दखल घेत ही निवड केली आहे. यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राज्य समन्वयक सुहास हुबे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष […]
फॅबटेकच्या ७ विद्यार्थ्यांची रेडिएन्ट इंडस्ट्री या नामांकित कंपनीमध्ये निवड
सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अजित घुटुकडे, अनिल साबळे, संदीप लवटे, संकेत पवार,सुजितकुमार कदम,वैभव दिघे, गणेश सागर अशा एकूण ७ विद्यार्थ्यांची रेडिएन्ट इंडस्ट्री या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. रेडिएन्ट इंडस्ट्री हि पुणे येथील […]
एसटी कर्मचाऱ्यांची आगार व्यवस्थापकाला मारहाण; शिवीगाळ करत कपडे पण फाडले
उस्मानाबाद आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आगार व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अजूनच चिघळणार असल्याचं दिसत आहेत. आगारात गेल्या बावीस दिवसांपासून एसटी महामंडळात राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सरकारनं भरघोस पगार वाढ केली असूनही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. […]
राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना बसणार फटका
राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. त्यातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान […]











