ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील शासकीय कार्यालये,हॉटेल,बँका,दुकाने आदी ठिकाणी दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

यापुढील काळात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरिता आज पंढरपूर नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी अरविंद माळी यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व शहरातील व्यापारी कमेटी, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेसोबत बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार चर्चा करण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या.

  • शहरातील सर्व शासकीय कार्यालये, बँका, आस्थापने, हॉटेल, मंगल कार्यालये, मॉल, मेळावे, मठ यांठिकाणी संपुर्ण लसीकरण (दोन्ही डोस पुर्ण) झालेल्या नागरीकांनाच प्रवेश देण्यात येईल. सर्वांनी आपले सोबत युनिव्हर्सल पास किंवा संपुर्ण लसीकरण (दोन्ही डोस पुर्ण) झाल्याचे सर्टीफीकेट बाळगणे.
  • चित्रपटगृह, मंगल कार्यालये, सभागृह अशा कार्याक्रमाच्या ठिकाणी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के नागरीकांना परवानगी दिली जाईल. अशा कार्यक्रमास 1000 पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल. तसेच कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करावे लागेल.
  • सर्वांना योग्य पद्धतीने मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. मास्क धारण न करणारे अथवा रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल.
  • जेथे जेथे शक्य आहे अशा ठिकाणी नागरीकांमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवावे.
  • सर्वांनी सानिटाईझरचा वापर वारंवार करावा अथवा साबणाने वारंवार हात स्वच्छ करावेत.
  • सर्व बँकांचे, आस्थापनांचे काऊंटर वारंवार निर्जंतुकीकरण करुन स्वच्छ करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये. खोकताना, शिंकताना टिश्यु पेपर अथवा रुमालाचा वापर करावा.
  • नियमांचे पालन न करणा-या व्यक्तीस र.रु.500/- इतका दंड आकारण्यात येईल. विविध आस्थापनांच्या ठिकाणी नियमांचे पालन न झाल्याचे दिसुन आल्यास र.रु.10000/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच एखाद्या संस्थेने/आस्थापनेने वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास र.रु.50000/- इतक्या दंडास पात्र असेल. तसेच एक आपत्ती म्हणुन कोविड 19 ची अधिसुचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
  • खाजगी वाहतुक, टँक्सी, बस वाहतुक करण्या-या वाहनांमध्ये नियंमांचे उल्लंघन झाल्यास र.रु.500/- इतका दंड व बसच्या बाबतीत मालक परिवहन एजन्सीला र.रु.10000/- इतका दंड आकारण्यात येईल.
  • कोविड 19 संबंधीच्या नियंमांचे सर्वांनी पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे अनिवार्यपणे पालन न केल्यास अथवा उल्लंघन केल्यास वरील प्रमाणे दंड व शास्ती करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यावर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. तरी सर्वांनी नियम व शिस्तीचे पालन करुन शासनाला सहकार्य करावे.

सदरच्या बैठकीमध्ये उपरोक्त नियमांबद्दलची माहिती सर्वांना सांगण्यात आली. या बैठकीस आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, पराग डोंगरे, व्यापारी कमिटीचे चेअरमन सतिश लिगाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव के.एन.घोडके, पश्चिमद्वार व्यापारी संघटनेचे गणेश बडवे महाजन, तसेच कौस्तुभ गुंडेवार, पांडुरंग बापट, चारुदत्त गंगाखेडकर, विश्वेश्वर भिंगे, सागर तारापुरकर, रुपेश दोशी हे उपस्थित होते.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *