ताज्याघडामोडी

संजय राऊत यांच्या परिवाराला करोनाची लागण; आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीही करोनाबाधित

राज्यातल्या करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. राज्यातल्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधले १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या करोनाबाधित आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या परिवारातल्या चार सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला करोना संसर्ग झाला […]

ताज्याघडामोडी

राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा […]

ताज्याघडामोडी

शिवभोजन योजनेच्या केंद्रांवर आता राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

शिवभोजन केंद्रांवरील गैरप्रकारांचा मुद्दा गाजल्यानंतर राज्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांवर सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या केंद्रावर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवता यावे, यासाठी सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४ शिवभोजन केंद्रांवरही सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवभोजन केंद्र चालकांना ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासून […]

ताज्याघडामोडी

केंद्राने महाराष्ट्राला काय दिले नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावे – भारती पवार

महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिले नाही, याबाबत राज्यातील कुणी एका मंत्र्याने लेखी द्यावे, असेही म्हटले. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिले नसेल, तर या राज्याची मी हक्काची मुलगी म्हणून ती माहिती […]

ताज्याघडामोडी

राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय आज; आरोग्य विभाग आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर आणि लावण्यात येणाऱ्या निर्बंधांवर आज सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीतला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवण्यात येईल. त्यानंतरच मुख्यमंत्री राज्यात कठोर निर्बंध जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. […]

ताज्याघडामोडी

हजारो अनाथांच्या माऊलीने घेतला इहलोकीचा निरोप

भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. सिंधुताईचे रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्झी रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वीचं सिंधुताईंवर हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने सिंधुताईंचे निधन झाले.  

ताज्याघडामोडी

1399 रुपयांची एक गोळी,कोरोनावर गुणकारी

Molnupiravir या गोळीला भारतामध्ये कोविंड विरोधात आपात्कालीन स्थितीमध्ये मान्यता देण्यात आली. सौम्य ते प्रभावी कोविड संक्रमणाविरोधात या गोळीचा वापर करता येणार आहे. सोमवारी ही गोळी भारतीय बाजारात उपलब्ध करून देण्यात आली. एका गोळी ची किंमत 1,399 रुपये आहे. ही गोळी पाच दिवसांच्या कोर्स साठी तयार करण्यात आलेली आहे. कोरोना संक्रमणा विरोधात आतापर्यंतचे हे सर्वात स्वस्त औषध मानल्या […]

ताज्याघडामोडी

अभियंत्याला भाजप उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडले महागात

सध्या नगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असताना अजून उर्वरित प्रभागातील मतदान प्रक्रिया बाकी आहे. ओबीसी आरक्षित वॉर्डातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रचाराच्या तोफा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, एका अभियंताला भाजप उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडले आहे. निवडणुकांमध्ये अनेक उत्साही कार्यकर्ते विविध पक्षाचे झेंडे घेऊन प्रचार करत असतात. […]

ताज्याघडामोडी

… तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर रश्मी ठाकरे राज्याचं नेतृत्व करु शकतील, असं मोठं आणि महत्त्वाचं विधान शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात राज्याचं नेतृत्व दुसरं कुणाकडे तरी द्यावं, अशा चर्चा होत असताना त्याचदरम्यान अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याने आता राजकीय जाणकारांबरोबर सर्वसामान्यही त्यांच्या विधानामागील राजकीय अर्थ काढू लागले […]

ताज्याघडामोडी

दरमहा लाईट बिल कमी येण्याची हमी, हॉटेल चालकास ७० हजार मागितले

एकीकडे राज्यात कोरोनाने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेली जनता विजेचे बिल भरताना मेटाकुटीस आली आहे,वीजबिलाचे हप्ते पाडून मिळत असले तरी या पोटी आकारले जाणारे व्याज बँकेच्या चौपट आहे.राज्याचे ऊर्जामंत्री वीज भरावेच लागेल म्हणून ठणकावून सांगत आहे,महावितरन वरील कर्जाचे आकडे वाचून दाखवत आहेत,काही ठिकाणी वरिष्ठांचा आदेश मानून वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारही खावा लागत आहे.तरीही महावितरण कंपनी आर्थिक […]