ताज्याघडामोडी

दरमहा लाईट बिल कमी येण्याची हमी, हॉटेल चालकास ७० हजार मागितले

एकीकडे राज्यात कोरोनाने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेली जनता विजेचे बिल भरताना मेटाकुटीस आली आहे,वीजबिलाचे हप्ते पाडून मिळत असले तरी या पोटी आकारले जाणारे व्याज बँकेच्या चौपट आहे.राज्याचे ऊर्जामंत्री वीज भरावेच लागेल म्हणून ठणकावून सांगत आहे,महावितरन वरील कर्जाचे आकडे वाचून दाखवत आहेत,काही ठिकाणी वरिष्ठांचा आदेश मानून वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारही खावा लागत आहे.तरीही महावितरण कंपनी आर्थिक डबघाईतून बाहेर पडली पाहिजे या हेतूने काही प्रामाणिक कर्मचारी काम करत असतानाच काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी आपल्या तुंबड्या भरून घेत असल्याचे दिसून येते.     

 असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आला असून ३ जानेवारी रोजी लाचलुचपत विभाग यांच्या वतीने जेऊर सेक्शन येथे करण्यात आलेल्या कारवाईत एका हॉटेल चालकास दर महा वीज बिल कमी येण्याची व्यवस्था उपकार्यकारी अभियंता यांना सांगून करून देतो असे सांगत ७० हजाराच्या लाचेची मागणी केली व तडजोडी अंती शिवलीला भेळ सेंटर पंढरीपूल येथे लाच स्वीकारताना बाळासाहेब टीमकरे व सहाय्यक यास रंगेहाथ पडकण्यात आले आहे.            

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *