गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक; चालक जखमी

राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकार वारंवार संप मागे घेण्याचं आवाहन करत असताना कामगार मात्र […]

ताज्याघडामोडी

उत्तरप्रदेशातील 13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत – शरद पवार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली. तसेच आगामी काळात भाजपला आणखी मोठे झटके बसणार असून 13 आमदार भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर करांसाठी चिंताजनक बातमी

राज्यात ओमायक्रोन आणि डेल्टा व्हेरियंटचे कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढले असून मुबंईत तर हा आकडा दरदिवशी २० हजारांच्या आसपास राहू लागला आहे.सोलापूर जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आणि मृतांच्या संख्येने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले होते तर अनेक कुटूंबाना हॉस्पिटल मधील उपचारासाठी लाखो रुपयांचा भुर्दड सहन करावा लागला […]

ताज्याघडामोडी

राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञांचा विरोध

राज्यातील दहावी बारावी सोडून सरसकट शाळा कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारी पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, आता कुठे दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होत होती. त्यात सध्या सरसकट शाळा बंद करणे हा निर्णय योग्य नसून अशैक्षणिक असल्याचे शिक्षण तज्ज्ञचा म्हणणे असल्यामुळे राज्यात पूर्ण शाळा बंद करण्याच्या निर्णयाला […]

ताज्याघडामोडी

बुलेट महागली! रॉयल एनफिल्डच्या ‘या’ बाईक्सचे वाढले भाव

रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करणं, हे अनेक तरुणाचं स्वप्न असतं. तुम्हीही जर बुलेट बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. रॉयल एनफिल्डने जानेवारी 2022 पासून आपल्या काही बाईकच्या किंमतीत वाढ केली आहे. यात कंपनीची लोकप्रिय बाईक क्लासिक 350, Meteor 350 आणि हिमालयनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या कोण-कोणत्या बाईकच्या किमतीत किती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नात्याला काळीमा ! नराधम भाच्याने केला मामीवर बलात्कार, व्हिडीओ बनवून करत होता ब्लॅकमेल

मध्यप्रदेशात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भाच्याने मित्रासोबत मिळून मामीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे घडली आहे. तसेच तिचा विवस्त्र व्हिडीओ करुन तिला ब्लॅकमेलही केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील 21वर्षीय महिला नवऱ्यासोबत ग्वाल्हेरच्या हनुमान नगर येथे भाड्याने राहत होती. महिलेचा नवरा मजुरीचे काम करतो. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागितला,शिपाई म्हणाला सरपंच,ग्रामसेवक आल्यावर या !

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने केसकरवाडी ग्राम पंचायतीचे रजिस्टर फेकून देत हातात दगड घेऊन ग्राम पंचायत कार्यालयातील कॉम्प्युटरच्या डिस्प्लेर घालून मोडतोड केल्याची फिर्याद ग्रा.प.शिपाई  सहदेव बाळु ढोबळे याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार सहदेव बाळु ढोबळे वय-28वर्षे व्यवसाय -नोकरी (ग्रामपंचायत शिपाई मौजे केसकरवाडी) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डोक्यावर काठीचे न थकता वार, मुलीच्या प्रियकराची बापाकडून निर्घृण हत्या

समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करुन त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. अमोल बाळकृष्ण ताल्हण असे मृत युवकाचे नाव आहे. मृताचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खलिस्तान्यांच्या निशाण्यावर PM मोदी! व्हिडिओ जारी करत दिली ‘ही’ धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेचं कडं तोडल्याचा दावा करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये २३ तारखेला पंजाबच्या लुधियानातील जिल्हा कोर्टात बॉम्बस्फोट झाला. या घटनांमध्ये ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता पंतप्रधान मोदींना पुन्हा रोखण्याचा उघड इशारा ‘शीख फॉर जस्टिस’ च्या […]

ताज्याघडामोडी

“हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं सुरक्षित कशी राहतील?”; योगी आदित्यनाथ यांचं विधान

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या लोकांना त्याचा फटका बसतो. जर हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं तरी कशी सुरक्षित राहतील. हिंदू सुरक्षित राहिला तर मुसलमान सुरक्षित राहील. आम्ही आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दंगल होऊ दिली नाही. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विधान […]