गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खलिस्तान्यांच्या निशाण्यावर PM मोदी! व्हिडिओ जारी करत दिली ‘ही’ धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेचं कडं तोडल्याचा दावा करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये २३ तारखेला पंजाबच्या लुधियानातील जिल्हा कोर्टात बॉम्बस्फोट झाला.

या घटनांमध्ये ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता पंतप्रधान मोदींना पुन्हा रोखण्याचा उघड इशारा ‘शीख फॉर जस्टिस’ च्या खलिस्तान समर्थकांनी दिला आहे.

खलिस्तानी समर्थकांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओतून भारत सरकारला धमकी दिली गेली आहे. येत्या २६ जानेवारीला खलिस्तानचा झेंडा दिल्लीत फडकवणार, अशी धमकी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे.

खलिस्तान्यांनी काय दिली धमकी?

भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी आता काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर खलिस्तानी समर्थकांनी ही धमकी दिली आहे. ‘खलिस्तानचा केसरी झेंडा दिल्लीत फडकवा आणि २६ जानेवारीला ‘तिरंगा अन् मोदीला रोखा’, आणि १० लाखांचे बक्षीस जिंका, असे खलिस्तानी समर्थकाने म्हटले आहे.

खलिस्तान्यांनी दिल्लीच्या नागरिकांनाही बजावले आहे. दिल्लीच्या नागरिकांनी २६ जानेवारीला बाहेर पडू नये. घरातच राहावे, असे शीख फॉर जस्टिसच्या गुरपतवंत सिंग पन्नून याने व्हिडिओतून म्हटले आहे. तसंच ‘पंतप्रधान मोदी आम्ही अजून थांबलेलो नाही. पंजाबला भारतापासून वेगळे करत नाही, तोपर्यंत आम्ही खलिस्तानी चळवळ थांबणार नाही’, अशी धमकी पन्नून याने दिली आहे.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अनेक शीख शेतकऱ्यांचा दिल्लीच्या सीमेवर मृत्यू झाला. हेच नाही, तर १९५० पासून शीखांना भारतात हिंसेचा सामना करावा लागतोय. यामुळे शीखांना स्वतंत्र करण्यासाठी खलिस्तान हाच एकमेव पर्याय आहे, असे खलिस्तानी समर्थक गुरपतवंत सिंग पन्नून म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *