ताज्याघडामोडी

पंढरपूर करांसाठी चिंताजनक बातमी

राज्यात ओमायक्रोन आणि डेल्टा व्हेरियंटचे कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढले असून मुबंईत तर हा आकडा दरदिवशी २० हजारांच्या आसपास राहू लागला आहे.सोलापूर जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आणि मृतांच्या संख्येने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले होते तर अनेक कुटूंबाना हॉस्पिटल मधील उपचारासाठी लाखो रुपयांचा भुर्दड सहन करावा लागला होता.

गेल्या दोन महिन्यापासून पंढऱपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या वेगाने घटत गेली.डिसेंबर २०२१ अखेरीस हि केवळ १३ इतक्या नीचांकी पातळीवर गेली होती.त्यामुळे आरोग्य यंत्रणाही काही प्रमाणात सुस्तावली होती तर उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर टेस्टही थांबल्या होत्या.मात्र आता शहर तालुक्यात कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हि अक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५० इतकी झाली आहे.

डिसेंबर महिन्यात प्राप्त झालेल्या माहिती नुसार पंढरपूर शहर व तालुक्यातील केवळ २३ टक्के नागिरकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते व लसीकरण केंद्रे ओस पडल्यामुळे प्रशासनाकडून वारंवार लस घेण्यासाठी पुढे या असे आवाहन करण्यात येत होते. मात्र फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.आता पुन्हा कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला असून या तिसऱ्या लाटेत ज्यांनी लस घेतली नाही अशा सह्व्याधी ग्रस्तांना व वयोवृद्धांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रशासन विविध निर्बध लागू करून प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत असताना नागिरकांनी आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *