गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रॅफिकमध्ये पिस्तुलीचा धाक दाखवणारे शिवसैनिक नाही

मुंबई, 31 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतू कोंडीदरम्यान  मार्ग काढण्यासाठी एका बहाद्दराने इतर वाहनचालकांना चक्क रिव्हॉल्व्हरची भीती दाखवली होती. या प्रकरणी अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु, पिस्तुल दाखवणारे हे शिवसैनिक नव्हते, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करण्यात आली, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दोन महिला तूप विकायला आल्या आणि घर साफ करून गेल्या

जळगाव, 30 जानेवारी : आजच्या काळात माणुसकी दाखवणारे लोक कमीच सापडतात. मात्र या लोकांनी माणुसकी दाखवल्यावर त्याची परतफेड चांगलीच असेल हेसुद्धा सांगता येत नाही. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये घडला आहे. जळगाव जिल्ह्यात नशिराबाद इथे दारोदार फिरत दोन महिला तूप विकत होत्या. या महिलांनी एका घरी आपण थकलो असून काही खायला मिळेल का अशी विचारणा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अ‍ॅक्टिंगच्या नावाखाली फसवणूक

चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने स्ट्रगलिंग अ‍ॅक्ट्रेसला देहविक्री व्यापारात ढकलल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 3 कास्टिंग डायरेक्टर्सना अटक केली आहे. या कारवाईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला साडेतीन लाखात विकले असल्याचेही तपासात समोर आले आहे. सदरील घटना गुरुवारी रात्रीची आहे. समाजसेवा शाखेचे डीसीपी राजू भुजबळ यांनी सांगितले […]

ताज्याघडामोडी

सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने नोकरभरती करीत असताना गैरमार्गाचा अवलंब केला असल्याचा आरोप आहे. तसेच बँकेसाठी फर्निचर, मालमत्ता खरेदी करीत असतान अनियमितता आढळली तसेच ७० कोटींचे कर्ज माफ केले असल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एस. डी. फराटे यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. तसेच नाबार्डकडेही तक्रार करण्यात […]

ताज्याघडामोडी

वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी कर्मचारी आले तर त्यांना गुलाबाचे देऊन गाडीत बसवून परत पाठवा

महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले आहे. भाजपच्या आंदोलनावेळी सभेत बोलताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळातील वाढीव वीजबिलांवर राज्य सरकारने आधी दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, यानंतर राज्य सरकारने यु-टर्न घेतल्याचं दिसून आल्यानंतर मनसे व भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, वीजबिल […]

ताज्याघडामोडी

अत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी चाकणकर आल्या नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाचाळपणा विरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आक्रमक होत रुपाली चाकणकर यांच्या फोटोला काळे फासून आझाद मैदान येथे जोरदार निषेध आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धी स्टंट असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले नसताना त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दणका; वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले आली आहे. काहींना अद्याप विद्युत बिले भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीजबिले रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कमी करण्याची मागणी होत आहे. असे असताना आता राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकबाकी साचल्यामुळे सरकारने आता वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.  […]

ताज्याघडामोडी

अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर या मंदिराचे काम जलद वेगाने सुरु आहे. देशातील करोडो लोक त्यासाठी आपापल्य परीने या मंदिराच्या पायाभरणीसाठी देणगी देत आहे. या अभियानाची सुरुवात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील या राममंदिरासाठी देणगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता भाजपचे विरोधी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक

वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या नेत्याला गोळ्या घालण्याची धमकी

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांना फेसबुक पोस्टद्वारे नीट रहा नाहीतर गोळ्या घालील अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी निषेध केला आहे.      महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले हे कम्युनिष्ट पक्षाचे प्रदेश सचिव असून शेतकरी चळवळीचे राज्यातील […]