नवी दिल्ली, 7 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी (7 जून) देशवासियांशी संवाद साधला. देशात 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधानांनी केली. तसंच कोरोनाची दुसरी लाट अद्यापही गेलेली नाही. कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न […]
ताज्याघडामोडी
कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज?
मुंबई : आजवर 22 कोटी जनतेचं देशभरात लसीकरण झालंय. पण लस कुठली घ्यावी, याबद्दल अजूनही तुमचा निर्णय झाला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे.. कुठल्या लसीमुळे जास्त आणि लवकर अँटिबॉडीज तयार होतात, याबद्दल नुकतंच एक संशोधन झालंय. पाहुया त्याचं उत्तर काय आहे. जगात सगळ्यात लसींसंदर्भात अभ्यास सुरू आहे. भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही […]
तुफान राडा, महिला ग्रामसेविका आणि सदस्यांमध्ये भर रस्त्यावर हाणामारी
भंडारा, 07 जून: भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव येथे महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. महिला सदस्यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली. घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुन महिला सदस्यासह महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे […]
घाडगे वस्ती जबरी चोरीतील आरोपीना अटक,तीनही आरोपी पंढरपुरातील
गत महिन्यात १८ मे रोजी तुंगत भोसले वस्ती येथील रहिवाशी योगेश दादासाहेब जाधव (वय वर्षे ३४ ) हे मोटारसायकल वरून पंढरपूर कडून तुंगतकडे जात असताना देगाव हद्दीतील घाडगे वस्ती येथे पाठीमागून बजाज पल्सर दुचाकी वरून आलेल्या तिघाजणांनी मोटार सायकल आडवी लावून योगेश जाधव यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मारहाण करून त्यांच्या जवळील ५० हजार रुपये […]
भाजपा मीडिया सेल सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई
भाजपा मीडिया सेलचा सोलापूर जिल्ह्ध्यक्ष सागर लेंगरे याच्या मालकीच्या हॉटेल सागरवर मोहोळ पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईत वाहनासह १४ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची अवैध दारू विक्री उजेडात आणली आहे.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी […]
कोरोनाचे आव्हान कायम; जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
होळकर वाड्यात शिवराज्यभिषेक दिन साजरा
पंढरपूर / प्रतिनिधी येथील चंद्रभागेच्यातीरावर असणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वाडा याठिकाणी आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. होळकर ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होळकर वाड्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची विधी होत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पूजा करण्यात आली. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचेही पूजन झाले. आणि शिवनामाचा जयघोष […]
मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान
सांगली: मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं […]
सिरमच्या आदर पुनावाला यांना केंद्र सरकारनेच दिली धमकी; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
अहमदनगर – देशात करोना संसर्गाने रौद्ररुप धारण केल्यानंतर केंद्र सरकारने करोना लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली होती. मात्र देशात केवळ दोनच कंपन्या करोना लसीची निर्मिती करत असल्यामुळे सहाजिकच लसीचा तुटवडा निर्माण झाला. या मुद्दावरून राजकारण तापलं होतं. त्यातच करोना लस निर्मितीत आघाडीवर असलेल्या सिरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी देश सोडून इंग्लंड गाठलं. त्यावेळी त्यांनी आपल्याला […]
धक्कादायक! सुनेने सासूचा गळा आवळून केला खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा
लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली […]











