

भाजपा मीडिया सेलचा सोलापूर जिल्ह्ध्यक्ष सागर लेंगरे याच्या मालकीच्या हॉटेल सागरवर मोहोळ पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईत वाहनासह १४ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची अवैध दारू विक्री उजेडात आणली आहे.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुप्पट तिप्पट दराने बेकायदा दारू विक्री होत असल्याचे आढळून येत होते.एकीकडे लॉकडाऊनचा बंदोबस्त तर दुसरीकडे अवैध धंद्यांवर कारवाई अशी दुहेरी जबाबदारी पोलिसांकडून पार पाडली जात असतानाच अवैध आणि बेकायदा दारू विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र कारवाई का होत नाही असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे दिसून आले.
पोलीस निरीक्षक अशोक सायकर आणि त्यांचे सहकारी हे पेट्रोलिंग करत असताना कन्या प्रशालेनजीक हॉटेल सागर येथे काही इसम वाहनामध्ये दारूचे बॉक्स भरताना आढळून आले.या बाबत संशय आल्याने पोलिसांनी हॉटेलची आणि वहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला.मोहोळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोहोळ परिसरात समाधान व्यक्त केले जात उत्पादन शुल्क विभागाने मनात आणले तर या अवैध दारू विक्रीच्या मुळाशी जाता येणे शक्य असताना,अनेक ठिकाणी बनावट दारूची विक्री केली जात असल्याची चर्चा होत असताना उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोड मध्ये केव्हा येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.